EPFO Passbook | नोकरदारांनो, EPF संबंधित मोठा बदल होणार, तुम्हाला फायदा होणार की नुकसान ते जाणून घ्या - Marathi News
EPFO Passbook | ईपीएफओ कायम कर्मचाऱ्यांना फायद्याचे नियम सांगत असते. लवकरच कर्मचाऱ्यांना एक गोड बातमी मिळणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे.
सरकारकडून लवकरच VPF म्हणजे वॉलेंट्री प्रॉव्हिडंट फंडांचे व्याजदर वाढू शकते. केवळ व्याजदरच नाहीतर गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढू शकते. सध्याच्या घडीलाही मर्यादा 1.50 लाख रुपये इतकी आहे. दिल्या गेलेल्या मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करून मिळणारे व्याज हे टॅक्सेबल असते. दरम्यान या सर्व गोष्टींवर रोजगार आणि कामगार मंत्रालय काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील वित्त वर्ष 2025 मध्ये अर्थसंकल्पामध्ये या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
नव्या नियमाचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे ईपीएफओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त बचत करता येईल. व्याजाची रक्कम आणि योगदानाची रक्कम वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीपर्यंत भरपूर पैसे जमा करून ठेवता येतील. आधीपेक्षा जास्त पैसे मिळतील. दरम्यान 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये योगदानासाठी 2.5 लाखांची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. परंतु या रकमेवर मिळणारे व्याज कर प्राप्त होते.
या कारणासाठी ठरवली मर्यादा :
याआधी जास्त कमाई करण्यासाठी बरेच व्यक्ती फिक्स्ड डिपॉझिट किंवा बँकांपेक्षा अधिक करमुक्त व्याजाचा फायदा उचलण्यासाठी या सुविधाचा वापर करणे पसंत करत होते. म्हणजे योगदान, व्याज आणि मॅच्युरिटी हे करमुक्त असणार आहे.
अधिक व्याज मिळते :
ईपीएफओ 1977 पासून 8 टक्क्यांहून अधिक व्याज देत होते. 1990 मध्ये व्याजदर 12% वर येऊन ठेपलं. पुढे वर्ष 2000 पर्यंत एकूण अकरा वर्ष याच पातळीवर व्याजदर होतं. त्यानंतर 2021-22 करिता व्याजदर आठ पॉईंट दहा टक्क्यांवर येऊन पोहोचलं. पुढे 2022-23 साठी 8.15% आणि आर्थिक वर्ष 2023 24 साठी 8.25% टक्के व्याजदर वाढत केले.
एवढे योगदान देऊ शकता :
भविष्य निर्वाह निधी त्याच बरोबर विविध कायद्यानुसार कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात VPF योगदानावर कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. हे बेसिक पगार आणि महागाई भत्त्याच्या 100% असू शकते. जास्त कमाई करणाऱ्यांकडून या गोष्टीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी सरकारने काही प्रयत्न देखील केले होते. त्यावेळी कर नसलेले व्याजाचे उत्पन्न वर्षाला 2.50 लाखांच्या योगदानापुर्ते मर्यादित ठेवण्यात आले होते. ईपीएफओचे सरासरी मासिक योगदान सात कोटी एवढे आहे. यामध्ये 75 लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारक आहेत आणि 20 लाख कोटींपेक्षा अधिक निधी आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | EPFO Passbook 27 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल