23 November 2024 6:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Monthly Pension Money | सरकारकडून पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर, कोणाला मिळणारं एक्स्ट्रा पैसे जाणून घ्या

Monthly Pension Money

Monthly Pension Money | दिवाळी आधीच केंद्र सरकारने पेन्शनकर्त्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. लोक शिकायत, कार्मिक आणि पेन्शन मंत्रालयकडून एक सर्क्युलर समोर आलं आहे. यामध्ये पेन्शन उपभोगत्यांना अनुकंपा भत्ता नावाने जास्तीची पेन्शन मिळणार आहे.

या पेन्शनचा लाभ केवळ 80 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात. 80 वर्षाखालील व्यक्ती या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. पेन्शन मंत्रालयाने 80 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांसाठी सरकारच्या सिवील सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला घेऊन नवीन निर्देशपत्रक जारी केली आहेत. अतिरिक्त भत्ते वितरित करण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली आहे.

सीसीएस पेन्शन नियम 2021 च्या 44 उपनियमाच्या सहाव्या प्रावधानांनुसार ज्येष्ठ नागरिकांना 80 वर्ष झाल्यानंतर किंवा 80 वर्ष होऊन गेल्यानंतर नियमावलीनुसार अनुकंपा भत्ता देण्यात येणार आहे.

80 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना फायदा होणार :
85 वर्ष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनच्या 20 टक्क्यांसाठी पात्र आहे. त्याचबरोबर 85 ते 90 वर्षांच्या पेन्शन उपभोक्त्यांसाठी 30% तर, 90 आणि 95 वर्षांच्या ज्येष्ठांसाठी 40 टक्के पात्र आहे. 95 ते 100 वर्ष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के मिळणार. त्याचबरोबर शंभर किंवा शंभरहून अधिक बॉय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के मिळणार.

पहिल्याच दिवसापासून होणार पात्र :
कल्याण विभागाच्या अधिसूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे अतिरिक्त पेन्शन किंवा अनुकंपा भत्ता उपभोगण्यासाठी पेन्शन घेणारे व्यक्ती 80 वर्ष झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अधिसूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा विलंब न होता पेन्शन उपभोक्त्यांना वेळेवर लाभ मिळाला पाहिजे. दरम्यान पेन्शन वितरणामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व बँकांना आणि विभागांना सूचना प्रसारित करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Monthly Pension Money 27 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Monthly Pension Money(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x