30 October 2024 7:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, कमाई होणार - NSE: IDEA NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याचा रिपोर्ट, कमाईची मोठी संधी - NSE: NTPC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 50% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL EMS Share Price | या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, संधी सोडू नका - NSE: EMSLIMITED Jio Finance Share Price | रॉकेट तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN Mutual Fund SIP | 5, 10 आणि 15 हजारांच्या मासिक SIP ने 50 लाखाची रक्कम किती कालावधीत मिळेल, पैशाने पैसा वाढवा
x

LIC Mutual Fund | बक्कळ पैसा देईल LIC इंफ्रा फंड, अनेक पटीने वाढेल पैसा, SIP वर मिळेल मोठा परतावा - Marathi News

LIC Mutual Fund

LIC Mutual Fund | एलआयसी म्युच्युअल फंड इन्फ्रास्ट्रक्चर फंडने मागील तीन वर्षांत दुप्पटीने आणि 5 वर्षांत तिप्पटीने कमाई करून दिली आहे. एसआयपीमध्ये देखील चांगल्या परतावा मिळवून दिला आहे. बरेच व्यक्ती एलआयसीच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे मानत आहेत.

देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मागील काही वर्षांत भारीच तेजी पाहायला मिळाली. याचा जास्तीत जास्त फायदा सेक्टर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांना देखील झाला आहे. ‘एलआयसी म्युच्युअल फंड इन्फ्रास्ट्रक्चर फंड’ ही एलआयसीची योजना देखील अशीच काहीशी आहे. जाणून घ्या या योजनेविषयीची संपूर्ण माहिती.

ओपन एन्डेड इक्विटी स्कीम :
एलआयसीची निगडित असलेली ‘एलआयसी म्युच्युअल फंड इन्फ्रास्ट्रक्चर फंड’ ही योजना इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर कंपन्यांशी जोडली गेली आहे. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये दीर्घकालीन गुंतवणुकींना आणखीन वाढवणे आहे. या कारणामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना जास्तीत जास्त परतावा कमावता येईल.

एलआयसी इन्फ्रास्ट्रक्चरचे मागील प्रदर्शन जाणून घ्या, त्याचबरोबर गुंतवणुकीवर किती परतावा मिळाला हे देखील जाणून घ्या :
1) एका वर्षामध्ये 73.48% परतावा मिळाला.
2) तीन वर्षांमध्ये 34.47% परतावा मिळाला.
3) पाच वर्षांमध्ये 29.58% परतावा मिळाला.
4) योजनेची सुरुवात झाल्यापासून म्हणजेच एकूण 16 वर्षांपासून ते आत्तापर्यंत 10.50% परतावा मिळाला आहे.

1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन देखील पाहून घ्या :
1) एका वर्षामध्ये 1,73,220 रुपये.
2) तीन वर्षांमध्ये 2,42,730 रुपये.
3) पाच वर्षांमध्ये 3,65,130 रुपये.
4) एकूण 16 वर्षांमध्ये 5,20,280 रुपये.

एसआयपी गुंतवणुकीवर मिळालेला नफा :
1) मासिक एसआयपी 10,000 रुपये.
2) तीन वर्षांची एकूण गुंतवणूक 3.60 लाख रुपये.
3) तीन वर्षांच्या एसआयपीवर मिळणारे रिटर्न 47.26%.
4) तीन वर्षानंतर होणारी फंड व्हॅल्यू 6,90,701.

5) मासिक एसआयपी 10,000.
6) पाच वर्षांत गुंतवलेली रक्कम 6 लाख रुपये.
7) पाच वर्षांच्या एसआयपीवर मिळणारे रिटर्न 39.30%.
8) पाच वर्षानंतर होणारी फंड वॅल्यू 15,57,615

कमीत कमी गुंतवणूक :
एलआयसीच्या या जबरदस्त फंडामध्ये तुम्ही एक रक्कम 5,000 हजारांच्या गुंतवणुकीपासून सुरू करू शकता. त्यानंतर एक रुपयाची मल्टिपल गुंतवणूक देखील केली जाते. दरम्यान एसआयपीमध्ये कमीत कमी 200 रुपये भरून गुंतवणूक करू शकता.

योजनेविषयीची ही माहिती देखील जाणून घ्या :
एलआयसीच्या या फंडाच्या कॉर्पसचा संपूर्ण हिस्सा 97.44% एवढा भाग इक्विटी गुंतवणुकीत जातो. त्यानंतर 19.30% भाग लार्ज कॅपमध्ये आणि 23.09% मिड कॅपमध्ये त्याचबरोबर सर्वाधिक जास्त भाग स्मॉल कॅप स्टॉकमध्ये गुंतवला जातो. हा भाग 55.05% एवढा असतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त गुंतवणूक केल्यामुळे या योजनेची रिस्क लेवल अतिशय उच्च स्थानावर आहे. स्कीमचा रेग्युलर प्लॅनसाठी रेशिओ 2.40% आणि डायरेक्ट प्लॅनकरिता 1.38% आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | LIC Mutual Fund 27 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#LIC Mutual Fund(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x