22 November 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणूकदार तुटून पडण्याची शक्यता, NTPC शेअर सुद्धा रॉकेट होणार - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | सेबीने एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओला मंजुरी दिली आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला प्रायमरी मार्केटमधून १०,००० कोटी रुपये उभारण्यास सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने गेल्या महिन्यात १८ सप्टेंबर २०२४ रोजी सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केली होती.

एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ कधी उघडणार?
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी कधी खुला होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओच्या माध्यमातून १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे शेअर्स जारी करणार आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात शेअर्स देण्यात येतील. कर्मचारी कोट्यांतर्गत राखीव असलेल्या शेअर्सवर ते बोली लावू शकतात. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ मार्फत जमा झालेल्या पैशांचा वापर कर्ज फेडण्यासाठी आणि इतर कॉर्पोरेट गरजा पूर्ण करण्यासाठी करणार आहे.

NTPC शेअरला होणार फायदा
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी IPO शेअरची प्राइस बँड प्रति शेअर 100-120 रुपयांच्या दरम्यान असण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच या IPO चा सकारात्मक परिणाम NTPC लिमिटेड कंपनी शेअरवर सुद्धा होईल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of NTPC Green Energy Ltd 28 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(132)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x