22 November 2024 5:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भारतीय अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर घसरली.

Narendra Modi, PM Narendra Modi, Amit Shah, Indian Economy, World Bank

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे कि भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान पाच ट्रिलियन डॉलर इतके व्हावे. परंतु याच आठवड्यात जागतिक बँकेच्या २०१८ च्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या वरून सातव्या क्रमांकावर घसरली आहे. २०१७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २. ट्रिलियन डॉलर होते. २०१८ मध्ये वाढ होऊन हा आकडा २.७३ इतका झाला.

पण क्रमवारीत मात्र भारताची घसरण झाली आहे. या घसरणीचे कारण म्हणजे २०१८ मध्ये फ्रान्स आणि ब्रिटनची अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत अधिक सक्षम स्थितीत राहिली. भारत ब्रिटन ला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर जाईल असे बोलले जात होते. परंतु ब्रिटन आणि फ्रान्सनेच भारताला सातव्या क्रमांकावर ढकलले आहे. भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सध्या अडचणीच्या काळातून जात आहे. याचाच सगळ्यात मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला आहे. ऑटोमोबाईल उद्योगाच्या घसरणीकडे सगळ्यात काळजीची बाब म्हणून बघितले जात आहे.

यामुळेच वाहन निर्मिती करण्याऱ्या काहींनी तर उत्पादन बंद करण्याची घोषणा दिली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाहनांच्या मागणीमध्ये होणारी घट. तसेच भारतातील बेरोजगारी व गरिबी हे देखील भारतातील अर्थव्यवस्थेवर परिमाण करणारे घटक आहेत. अर्थव्यवस्थेच्या आकारमानात झालेल्या वाढीचा अर्थ असा नाही कि लोकांचे जीवनमान सुद्धा त्याचप्रमाणे वाढत आहे. भारताचे आकारमान लक्षात घेता लोकसंख्येच्या आधारावर पहिले तर दरडोई उत्पनात आणि गरिबीतून बाहेर पडणाऱ्यांची संख्येत हळूहळू सुधारणा होत आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असली तरीही भारतापुढे गरिबीचे आव्हान अजूनही कायम आहे. आणि यात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x