21 November 2024 8:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Diwali 2024

Diwali 2024 | ‘आली माझ्या घरी दिवाळी’ हे गाणं दिवाळीच्या सणांमध्ये प्रत्येकजण गुणगुणत असतं. आपण असं का बरं म्हणतो, दिवाळी घरी येते म्हणजे नेमकं काय, त्याचबरोबर दिवाळीच्या 4 ते 5 दिवसांचं शास्त्राप्रमाणे महत्त्व काय आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं फार कमी लोकांना ठाऊक आहे. दिव्यांची माळ ठेवून प्रत्येकाचं आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी दिवाळी आपल्या घरी येते.

दिवाळीचा अर्थ :
दिवाळीला आपण दीपावली असं देखील म्हणतो. दीपावली म्हणजे काय तर, दीप म्हणजे ज्योती आणि वली म्हणजे रांग. दीपावली म्हणजे दिव्यांची रांग. या दीपावलीचा आपल्या जीवनाशी थेट संबंध येतो. प्रत्येकाच्या आयुष्यात चढा-ओढ, यश-अपयश, निराशा, हसू या गोष्टी येत जात राहतात.

परंतु आपण आपल्या यशाची लक्ष केंद्रित करण्यास कोणतीही कसर बाकी ठेवायची नाही. दिव्याची राग असं सांगते की, एका मागोमाग एक पायरी चढत आणि प्रत्येक पायरीवर चमकत तुम्हाला पुढे जायचं आहे. अशा पद्धतीची ध्येयाची आणि उत्साहाची ही दीपरांग कधीही संपू नये. त्यामुळे प्रत्येक वर्षी दीपावलीला आपण दारामध्ये दिव्यांची रांग लावतो.

दिव्याची अर्धी वात बाहेर का ठेवतो :
तुळशी वृंदावनासमोर आपण दररोज दिवा जाळतो. दिवा जळताना केव्हाही दिव्याची अर्धी वात तेलामध्ये आणि अर्धी वात बाहेर ठेवतो. संपूर्ण वात तेलामध्ये बुडवली तर, तुमचा दिवस जळणारच नाही. आपलं आयुष्य देखील असंच काहीसं असतं. काही गोष्टींना मागे सोडून दुनियेच्या बरोबरीने डोकं वर काढून आपल्याला प्रकाशमय बनायचं असतं.

दरम्यान आज धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी म्हणजेच देवी धन्वंतरी तिची पूजा आपण आजच्या दिवशी करतो. देवी धन्वंतरीची पूजा करणे अत्यंत लाभदायि असते. देवीची कायम कृपादृष्टी आपल्यावर असावी यासाठी तुम्ही. देवीला फुल वाहून तिचे उपासना करू शकता. असं केल्याने तुमच्या आयुष्यात धन, संपत्ती कधीही कमी पडणार नाही.

उटण्याचे वैशिष्ट्ये :
पूर्वीच्या काळी बऱ्याच महिला सौंदर्यासाठी उटणे लावायच्या. आत्ता वेगवेगळे चंदन युक्त साबण आणि स्क्रब बाजारात आले आहेत. परंतु उटण्यामध्ये औषधी वनस्पतींचा समावेश असतो. त्याचबरोबर त्यामध्ये औषधांचा सुगंध दरवळतो. या औषधी आणि सुगंधित वनस्पतींमुळे तुमच्या त्वचेचे आरोग्य त्याचबरोबर तुमच्या शरीराचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. दरम्यान आपल्या शरीरावर असणारी कीटकनाशके उटण्यामुळे मरून जातात. त्यामुळे उटणे लावणे अत्यंत गरजेचे आहे.

अशा पद्धतीने दिवाळीचा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात उत्साहाचा आणि नव्या जोशाचा दिवा घेऊन येतो. आपणही दिव्याप्रमाणे कायम चमकलो पाहिजे असा निर्धार मनाशी ठेवून आपण आपले ध्येय गाठायला हवे.

Latest Marathi News | Diwali 2024 29 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Diwali 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x