30 October 2024 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Lakshmi Pujan | नवीन लग्न झालंय; लक्ष्मीपूजनची विधी माहित नाही, चिंता नको, या अचूक पद्धतीने करा लक्ष्मीपूजन - Marathi News Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News HAL Share Price | HAL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: HAL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाई होणार - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर BEL आणि TCS सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH Horoscope Today | पुढच्या दिवाळीपर्यंत या राशींसाठी आर्थिक भरभराटीचा काळ सेल, करावा लागेल एक जबरदस्त उपाय
x

Post Office Scheme | दर 3 महिन्यांनी 10,250 रुपये देईल ही योजना, प्लस मॅच्युरिटीला 7,05,000 रुपये मिळतील, फायदा घ्या - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | दिवाळीचा सण सुरू झाला आहे. बऱ्याच व्यक्ती दसऱ्याला आणि दिवाळीनिमित्त सोन्यामध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे आणि सुरक्षिततेचे मानतात. त्याचप्रमाणे पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम देखील अतिशय उत्तम परतावा देणाऱ्यांपैकी एक स्कीम आहे. या योजनेमध्ये तुम्ही 3 महिन्यांच्या केवळ व्याजाने 10250 रुपयांची कमाई करू शकता.

ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली ही जबरदस्त योजना चांगल्या रिटर्नवर अनेक सवलती देखील देते. या दिवाळीला तुम्ही तुमच्या वृद्ध आई-वडिलांना गिफ्ट देण्यासाठी पोस्टमध्ये पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा कमावून खुश करू शकता. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे एकमेव कारण म्हणजे इथे तुम्हाला एफडीपेक्षा देखील जास्तीचे व्याजदर मिळते. दरम्यान या योजनेमध्ये तुम्हाला टॅक्स सूटचा लाभ देखील अनुभवता येतो. त्याचबरोबर ही योजना 5 वर्षानंतर मॅच्युअर होते.

सीनियर सिटीजन सेविंगचे व्याजदर जाणून घ्या :
सध्याच्या घडीला पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीम या योजनेवर वार्षिक आधारावर 8.2% ने व्याजदर दिले जात आहे. 1 जानेवारी 2024 ला हे व्याजदर बदलण्यात आले होते. त्याचबरोबर तुम्हाला मिळणार हवे आज हे तीन महिन्यांच्या आधारावर कॅल्कुलेट केलं जाणार. समजा पोस्टाच्या खात्यात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने 15G/15H हा फॉर्म भरला असेल तर, व्याजाच्या रकमेवर टीडीएस कापला नाही जाणार.

सरकारच्या या योजनेत मिळते कर सवलत :
गुंतवणूकदाराला टीडीएस भरावा लागणार की नाही हे त्याच्या गुंतवणुकीच्या रिटर्नवर अवलंबून असते. समजा एखाद्या व्यक्तीला मिळणारे रिटर्न 50,000 रुपये आहे तर, त्याला व्याजावर टीडीएस भरावा लागतो. दरम्यान ही योजना 5 वर्षानंतर मॅच्युअर होत असून ज्येष्ठ नागरिक योजनेत 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

योजनेच्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन :
1. गुंतवली जाणारी एकूण रक्कम : 5 लाख रुपये
2. वार्षिक व्याजदर : 8.2%
3. मॅच्युरिटीचा काळ : 5 वर्ष
4. मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम : 7,05,000
5. व्याजाने होणारी कमाई : 2,05,000
6. तीन महिन्यांनी मिळणारी इन्कम : 10,250

प्रीमॅच्युअरचे नियम :
पोस्टाच्या योजनेचे पैसे गुंतवल्यानंतर गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या तारखेनंतर कधीही पोस्टाची योजना बंद करू शकतो. विशेष गोष्ट म्हणजे गुंतवलेली रक्कम मॅच्युरिटीच्या 1 वर्षाआधी अगदी सहजरीच्या काढली जाऊ शकते. म्हणजेच तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची पेनल्टी घेण्यात येणार नाही. केवळ 1 किंवा 2 वर्षांच्या आत काढल्या जाणाऱ्या रकमेवर प्रिन्सिपलवर 1.5% एवढी अमाऊंट चार्ज करण्यात येईल. त्याचबरोबर 2 ते 5 वर्षाच्या काळामध्ये प्रिन्सिपलचे 1% अमाऊंट चार्ज करण्यात येईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(179)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x