31 October 2024 2:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG Shahrukh Khan | मन्नत व्यतिरिक्त शाहरुख खानचे परदेशात देखील आहेत करोडोंचे बंगले, दुबई आणि लंडनला असतात अभिनेत्याच्या वाऱ्या Horoscope Today | शनि देवाच्या मार्गी होण्याने या राशींना होणार लाभ; दिवाळीचा सण असेल अतिशय खास - Marathi News SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाची ही योजना अनेक पटीने पैसा वाढवते, खास फंडात पैशाने पैसा वाढवा - Marathi News Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
x

Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल

Hair Style

Hair Style | दिवाळी सण सुरू झाला आहे. बऱ्याच महिला सुंदर अशी काठापदराची पारंपारिक साडी किंवा सलवार कुर्ता सेट परिधान करून त्याचबरोबर त्यावर साजेचा असा साज शृंगार करून तयार होतात. तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी मेकअपपासून ते साडीपर्यंत सर्व काही आतापर्यंत सेट करून ठेवलं असेल. परंतु केसांचं काय.

फेस्टिवल सीझनमध्ये आपण आपल्या आऊटफिटप्रमाणे केसांची हेअर स्टाईल करावी. परंतु स्वतःलाच स्वतःची सुंदर हेअर स्टाईल करता येत नाही. अशावेळी तुमच्याजवळ हेअर स्टाईल करण्यासाठी कोणीही नसेल परंतु सर्व महिलांमध्ये उठून दिसायचं असेल तर, आज आम्ही तुम्हाला साडी तसेच सलवार कुर्त्यावर शोभतील अशा हेअर स्टाईल घेऊन आलो आहोत. हेअर स्टाईल अभिनेत्रींनी देखील केल्या आहेत.

1. डायमंड साडीवर सुंदर दिसेल लांबसडक वेणी :
लांब केसांच्या महिलांना नेमकी कोणती हेअर स्टाईल करावी हेच सुचत नाही. एवढे मोठे केस सांभाळणे कंटाळवाणे वाटते. समजा तुम्ही लाल रंगाची काठपदराची साडी नेसत असाल तर, तुम्ही फ्रंट वरिएशन करण्यासाठी अर्धा भांग पाडून साईडवेणी घालू शकता. त्यानंतर मागील केसांची सुंदर अशी लांबसडक वेणी घालून डायमंडचा रबर लावू शकता. यामुळे तुमचा फेस्टिवलुक अतिशय पारंपारिक आणि सुबक दिसेल.

2. फ्लॅट बन आणि गजरा :
बऱ्याच महिलांना केसांचा फ्लॅट लुक सुंदर दिसतो. खास करून उंच आणि धीप्पड महिलांना केसांचा बन देखील सुबक दिसतो. जर तुम्ही सुद्धा उंच आहात तर, काळ्या रंगाच्या साडीवर मध्ये भाग पाडून फ्लॅटबन बांधू शकता. या बनवर तुम्ही मोगऱ्याच्या कळ्यांचा पांढराशुभ्र गजरा माळून तुमचा लूक कम्प्लीट करू शकता.

3. सलवार कुर्तावर सुंदर क्रिंप कर्ल :
तुम्ही सिल्कचा सलवार कुर्ता परिधान केला असेल तर, केस मोकळे सोडून क्रिंप कर्ल करून फुलांच्या माळा लावू शकता. तुम्हाला फेस्टिव सिझनमध्ये फोटोच काढण्यासाठी अत्यंत सुंदर दिसेल.

4. झुमक्यांबरोबर सेट करा केस :
सध्या बऱ्याच अभिनेत्रींनी झुमक्यांबरोबर केस सेट करण्यासाठी ट्रेंड फॉलो केला आहे. हा ट्रेंड अतिशय सुंदर दिसतो. तुम्ही झुमके त्याचबरोबर झुमक्यांच्या वेलींबरोबर सुंदरशी हेअर स्टाईल करू शकता. त्यासाठी मध्ये भांग पाडायचा आहे. त्यानंतर झुमके कानांमध्ये सेट केल्यानंतर वेलींना केसाच्या मागच्या बाजूस घेऊन यायचं आहे आणि मागील बाजूस मध्यभागी पिनांनी व्यवस्थित टग करून घ्यायचं आहे. असं लुक फेस्टिव सीजनमध्ये अतिशय सुंदर दिसतो.

Latest Marathi News | Hair Style 31 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Hair Style(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x