16 April 2025 5:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Shahrukh Khan | मन्नत व्यतिरिक्त शाहरुख खानचे परदेशात देखील आहेत करोडोंचे बंगले, दुबई आणि लंडनला असतात अभिनेत्याच्या वाऱ्या

Shahrukh Khan

Shahrukh Khan | बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याने आतापर्यंत स्वतःच्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दरम्यान बॉलीवूडच्या किंगचा येत्या 2 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मन्नत बाहेर शाहरुखच्या चाहत्यांची हजेरी असते. त्याची एक झलक पाहण्यासाठी तरुण-तरुणी प्रचंड प्रमाणात उत्सुक असतात.

मन्नत
तुम्ही शाहरुखच्या मन्नत बंगल्याविषयी आतापर्यंत बऱ्याचदा ऐकलं असेल. म्हणत बाहेर येता जाताना शाहरुख बऱ्याचदा स्पॉट झाला आहे. शाहरुखचा हा बंगला मुंबईमधील वांद्रे येथे असून 27,000 स्क्वेअर फुट त्याचबरोबर एकूण 6 मजली असलेल्या मन्नतची किंमत आजच्या घडीला 200 कोटी रुपये एवढी आहे.

4 Mannat

लंडनमधील बंगला :
अभिनेत्याचा लंडन येथे देखील एक आलिशान बंगला आहे. हा बंगला लंडन येथील पॉश एरिया पार्क लेनमध्ये आहे. शाहरुखचा लंडनच्या बंगल्याची किंमत 183 कोटी रुपये एवढी आहे. शाहरुख त्याच्या मित्रांबरोबर किंवा पत्नी गौरी आणि मुलांबरोबर क्या बंगल्यावर राहण्यासाठी येत असते.

3 London

दुबईमधील पाम जुमेराह विला :
शाहरुख खानचा दुबईमधील पाम जुमेराह हा बंगला देखील अतिशय सुंदर आहे. दुबईमधील बंगला एखाद्या राजवाड्याप्रमाणेच दिसतो. विला अतिशय आलिशान असून बंगल्यामध्ये एकूण 6 बेडरूम 2 रिमोट कंट्रोलचे गॅरेज त्याचबरोबर एक खाजगी पूल देखील आहे. शाहरुखच्या या आलिशान बंगल्याची किंमत 100 कोटी रुपयांची आहे.

2 Dubai

अलिबाग हॉलिडे होम :
अभिनेता अलिबाग येथे येतो तेव्हा समुद्रकिनारच्या या हॉलिडे होममध्ये राहतो. हा बंगला एखाद्या पिकनिक फार्म हाऊस सारखाच आहे. 10,960 स्क्वेअर फुट असलेल्या या आलिशान बंगल्याची किंमत 15 कोटी रुपये आहे. अशा पद्धतीने शाहरुख खान कैक कोटींचा मालक आहे.

1 - Alibagh

Latest Marathi News | Shahrukh Khan 31 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shahrukh Khan(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या