1 November 2024 4:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Vs NHPC Share Price | SJVN आणि NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: NHPC IRFC Share Price | IRFC स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत महत्वाचे संकेत, पुन्हा रॉकेट तेजीने कमाई होणार- NSE: IREDA Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Multibagger Stocks | शेअर प्राईस 19 रुपये, मालामाल करतोय हा शेअर, यापूर्वी दिला 2110% परतावा - BOM: 530883 Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 65% पर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
x

Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक

Diwali Special Ubtan

Diwali Special Ubtan | प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीच्या दिवसांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. दारांमध्ये शुभक रांगोळीसह ज्योतींची माळा लावत अनेकांनी दिवाळी पहाटेची सुरुवात केली. त्याचबरोबर दिवाळी म्हटलं तर, अभ्यंगस्नान देखील आलं. शास्त्रात अभ्यंगस्नानाला एक विशेष असं महत्त्व आहे. बऱ्याच व्यक्ती दिवाळीच्या कोणत्याही एका दिवसामध्ये अभ्यंगस्नान करतात. परंतु तुम्ही दिवाळीच्या पाचही दिवसांमध्ये सुगंधित आणि टवटवीत दिसू शकता. यासाठी तुम्हाला एक दिवाळी स्पेशल उटणे तयार करावे लागेल.

आम्ही सांगितलेले हे उटणे तुम्ही दिवाळी आणि दिवाळीनंतरही इतर दिवसांत वापरू शकता. कारण की हे उटणे प्राकृतिक आणि कीटकनाशक आहे. या उटण्यामुळे तुमच्या शरीरावरची संपूर्ण घाणे निघून जाईल. त्याचबरोबर चेहऱ्यावर आणि त्वचेवर एक वेगळीच चमक येईल. जाणून घ्या उटण्याची संपूर्ण माहिती.

साहित्य :
उटणे तयार करण्यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी, दही, दूध आणि मोहरीचं तेल लागणार आहे. त्याचबरोबर लिंबाचा रस आणि हळद पावडर देखील लागेल.

चटकन तयार करा उटणे :
सुंदर उटणे तयार करण्यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी मिक्सरमध्ये बारीक किसून घ्यायची आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये मोहरी पूड काढून त्यामध्ये दूध, दही, हळद, लिंबाचा रस आणि मोहरीचे तेल मिक्स करायचं आहे.

उटणे लावण्याची योग्य पद्धत :
उटणे लावण्यासाठी तुम्ही थोडीशी पेस्ट घेऊन संपूर्ण अंगाला चोळून घ्या. पेस्ट शरीरावर पसरली की, थोडा वेळ तसेच थांबा जेणेकरून पेस्ट हलकीशी चुकेल. पेस्ट थोडी ओलसर असल्यानंतर तुम्ही पाण्याचा हात घेऊन संपूर्ण उटणे शरीरावर चोळून घेऊ शकता. त्याचबरोबर चेहरा आणि मानेला उटणे लावताना हलका हात द्या. नाहीतर तुमचा चेहरा लाल देखील पडू शकतो.

Latest Marathi News | Diwali Special Ubtan 01 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Diwali Special Ubtan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x