5 November 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO
x

EPF on Salary | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, मग हे 7 फायदे लक्षात ठेवा, 90% नोकरदारांना माहित नाही - Marathi News

EPF on Salary

EPF on Salary | खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या सॅलरीचं स्ट्रक्चर पूर्णपणे माहीत असतं. कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रत्येक महिन्याला 12% एवढा भाग ईपीएफओ अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ईपीएफ खात्यात ट्रान्सफर केले जातात. या खात्यात पैसे जमा करून कर्मचाऱ्यांसाठी प्रॉव्हिडेंट फंड जमा होतो. तयार केलेला जमा फंड कर्मचाऱ्याला भविष्यात वापरता यावयासाठी अनेक वर्षांपासून फंड जमा करावा लागतो.

बऱ्याच कर्मचाऱ्यांना ही गोष्ट ठाऊक नसते की, तुमचा केवळ ईपीएफ कापला जात नसून तुम्हाला एकूण 7 प्रकारच्या सुविधा मिळतात. कोणत्या जाणून घेऊ.

पेन्शन लाभ :
प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पगारातील 12% रक्कम कापली जाते. यामधील एक भाग ईपीएफ म्हणजेच एम्पलोयी प्रॉव्हिडंट फंड आणि दुसरा ईपीएस म्हणजेच एम्पलोयी पेन्शन स्कीममध्ये कन्व्हर्ट होत असतो. तुमच्या पगारातील 12% रकमेसह कंपनीकडून देखील योगदान होतं असते. दरम्यान तुम्ही 58 वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पेन्शन प्राप्ती होते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेन्शन प्राप्त होण्यासाठी तुम्हाला कामाचे 10 वर्ष योगदान देणे गरजेचे आहे.

VPF गुंतवणूक :
कर्मचारी ईपीएफ शिवाय VPF म्हणजेच वॉलेंटेरी प्रॉव्हिडंट फंडमध्ये देखील गुंतवणूक करू शकतात. या फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुमच्या सॅलरीतील एक्स्ट्रा भाग कॉन्ट्रीब्युट करू शकता.

नॉमिनेशनचा मिळतो फायदा :
ईपीएफओ अंतर्गत फायदा घेत असणाऱ्या कर्मचाऱ्याला नॉमिनेशनचा फायदा देखील मिळतो. म्हणजेच कर्मचाऱ्याचा अकाळी मृत्यू झाला तर, पीएफचे सर्व पैसे नॉमिनीला मिळतात.

पैसे काढण्याचे नियम जाणून घ्या :
ईपीएफ खात्यामधून पैसे काढण्याचे वेगवेगळे नियम सांगितले गेले. यामधील एक नियम म्हणजे तुम्ही नोकरी बदलल्यानंतर आरामात पीएफ काढू शकत नाही. यासाठी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करून घ्यावे लागतात. त्याचबरोबर तुम्ही 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ नोकरी करत नसाल तर, पैसे काढण्याची अनुमती असते.

लाईफ इन्शुरन्स :
प्रत्येक कंपनीमध्ये लाइफ इन्शुरन्स नसते. जर तुम्ही काम करत असलेल्या कंपनीमध्ये लाइफ इन्शुरन्स नसेल तर,’एम्पलोयी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स’ अंतर्गत इन्शुरन्स लाईक कवरेज मिळते. परंतु हे कव्हरेज खूप कमी काळासाठी असते.

ईपीएफवर व्याज मिळते :
ईपीएफमधून प्रत्येक कर्मचाऱ्याला वार्षिक दरानुसार व्याज मिळते. हे व्याज कंपाऊंडिंग असते.
ईपीएफवर 8.15 टक्के दराने वार्षिक व्याजदर मिळते. ईपीएफ प्रमाणे तुम्हाला ईपीएसवर कोणत्याही प्रकारचे रिटर्न मिळत नाही.

अंशिक काढत :
तुम्हाला ईपीएफ खात्यातून अंशिक काढतीची सुविधा देखील मिळते. परंतु याचे वेगवेगळे नियम आहेत. यामध्ये तुम्हाला पूर्ण पैसे काढून घेण्याची अनुमती नाही. अकाउंटमध्ये लिमिटपर्यंत पैसे ठेवून बाकीची रक्कम काढता येऊ शकते. ही अमाऊंट तुम्ही 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 50 टक्क्यांपर्यंत काढू शकता.

तुमच्या घरामध्ये कोणताही प्रकारचा कार्यक्रम तसेच लग्न समारंभ, आई-वडिलांच्या दवाखान्याचा खर्च अशा मोठमोठ्या खर्चासाठी तुम्ही अंशिक पैसे काढतीच्या सुविधेचा फायदा घेऊ शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPF on Salary 04 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPF on Salary(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x