21 November 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News
x

Railway Recruitment | रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; काय असेल पात्रता, अर्जाची तारीख जाणून घ्या

Railway Recruitment

Railway Recruitment | सध्याच्या घडीला सरकारी नोकरी मिळणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे. कारण की प्रत्येक जण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहे. अशातच रेल्वेमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. रेल्वेमध्ये ‘ग्रुप डी’ या पदासाठी भरती निघाली असून शेवटची तारीख काय असणार आहे जाणून घ्या.

नेमकी कोणत्या पदासाठी भरती :
रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींसाठी स्काऊट्स अँड गाईड या कोट्या अंतर्गत ‘ग्रुप डी’ या पदांसाठी जाहीर भरती निघाली आहे. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून स्वतःची स्वप्नपूर्तीचा आकार करण्याची संधी मिळवावी.

भरती विषयीची संपूर्ण माहिती :
रेल्वेच्या या खास भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2024 या तारखेपासूनच सुरू झाली आहे. त्याचबरोबर शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 असणार आहे. म्हणजे चालू महिन्यात केव्हाही तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता. भरतीकरिता लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी तुम्ही www.rrcpryj.org त्या वेबसाईटवर जाऊन भेट देऊ शकता.

पात्रता आणि वयाची अट :
रेल्वेच्या डी ग्रुप भरतीसाठी उमेदवाराने बोर्डातून मान्यताप्राप्त इंटरमीडिएट परीक्षेत उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पदवी धारण केलेले आणि बॅचलर उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. त्याचबरोबर टेक्निशियन या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराने आयटीआय क्षेत्रात उत्तीर्णता मिळवलेली असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी वयाची अट 18 ते 33 दरम्यान दिली गेली आहे.

रेल्वे संबंधित सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्याचबरोबर या भरतीची शुल्क फील 500 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

सोप्या स्टेप्स फॉलो करून करा अर्ज :
1. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.rrcpryj.org या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
2. त्यानंतर संबंधित अर्जावर क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या लिंकवर देखील क्लिक करायचं आहे.
3. त्यानंतर महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
4. त्यानंतर फी पूर्ण करून फ्रॉम सबमिट करून घ्या आणि त्याची प्रिंट तुमच्याजवळ काढून घ्या.

Latest Marathi News | Railway Recruitment 04 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Railway Recruitment(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x