23 November 2024 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News

Bank Account Alert

Bank Account Alert | बरीच तरुण मंडळी केवळ पोटाचा प्रश्न सुटण्यासाठी पैसे कमावतात. प्रत्येक महिन्याला केवळ मोजक्या गोष्टींसाठी पैसे कसे खर्च करता येतील याकडे लक्ष देतात. बाकी कोणत्याही प्रकारची फ्युचर प्लॅनिंग किंवा गुंतवणूक या सर्व गोष्टींपासून लांब राहणं पसंत करतात. एवढेच नाही तर बऱ्याच तरुणांना पैशांची गुंतवणूक करण्याआधी गुंतवणुकीचे कोणतेही नियम माहिती नसतात. आज आपण कोणत्या 4 फायनान्शियल चुका केल्यामुळे गोत्यात येऊ शकतो हे जाणून घेणार आहोत.

बँक खात्यात पैसे असेच ठेवणे :
सध्याच्या घडीला बरेच तरुण मंडळी आपल्या सॅलरीचे प्लॅनिंग अजिबात करत नाहीत. प्रत्येक महिन्याला आलेले पैसे बँकेच्या खात्यात तसेच ठेवतात. परंतु या पैशांवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज किंवा कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नाही. त्याऐवजी तुम्ही तुमची जमा असलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवली तर, तुम्हाला वार्षिक व्याजदर त्याचबरोबर कर सवलतीची सूट देखील मिळेल.

प्रत्येकाच्या सल्ल्यानुसार वागणे :
वित्तीय गोष्टीशी निगडित सल्ले आपण आपल्या नातेवाईकांकडून तसेच मित्र परिवाराकडून घेत असतो. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाची इन्कम सारखी नाही. त्यामुळे जो तो तुम्हाला त्याच्या फायनान्शिअल स्टेटसनुसार आणि गुंतवणुकीनुसार सल्ले देणारा. तुम्ही सर्वांचे सल्ले ऐकून जरी घेत असाल तरीसुद्धा, प्रत्येकाच्या म्हणण्याप्रमाणे वागणे चुकीचे ठरू शकते. कारण की, तुम्ही तुमच्या फायनान्शियल स्टेटसला प्राथमिकता दिली पाहिजे. तेव्हाच तुमचे गुंतवणुकीबाबतचे प्रश्न सुटतील.

भविष्याबद्दल विचार न करणे :
बरेच व्यक्ती पैसे कमवण्याच्या नादात कमी काळात पैसे कसे कमवता येतील अशा प्लॅनिंगकडे लक्ष देतात किंवा कोणाच्याही बोलण्यामध्ये फसतात. अशावेळी तुम्हाला सतर्क राहून योग्य ठिकाणी पैसे गुंतवले पाहिजे. यासाठी तुम्हाला भविष्याचं प्लॅनिंग करावे लागेल. घर घेण्याचं प्लॅनिंग, मोबाईल फोन किंवा मौल्यवान वस्तूचं प्लॅनिंग. यासारखं प्लॅनिंग आधीच करून ठेवलं तर, तुम्हाला पैसे जमा करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

उगीचच एक्सपेरिमेंट करणे :
तरुणांना पैशांशी एक्सपेरिमेंट करणे प्रचंड आवडते. कमी काळात डबल पैसे कसे कमवता येतील याकडे तरुणांचा कल असतो. परंतु आतापर्यंत कोणताच व्यक्ती कमी काळात श्रीमंत झालेला नाहीये. यासाठी तुम्हाला योग्य गुंतवणूक आणि अधिकृत गोष्टी तपासून घ्यावे लागतील. त्यामुळे खास तरुणांनी पैसे गुंतवण्यात त्या योजनेमध्ये किंवा गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क तर नाही ना या गोष्टीची काळजी नक्की घेतली पाहिजे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bank Account Alert 04 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank Account Alert(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x