22 November 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI चा हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

HDFC Mutual Fund | पगारदारांनो बँक FD विसरा, हा फंड 1 वर्षात 79.73% परतावा देतोय, वेगाने पैसा-संपत्ती वाढवा - Marathi News

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | दीर्घकाळासाठी पैशाची गुंतवणूक करण्याकरिता म्युच्युअल फंड हे टूल अतिशय फायद्याचे मानले गेले आहे. कारण की ज्या व्यक्तींना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास रिस्की वाटते अशा व्यक्ती म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून आकर्षक व्याजदरांचा त्याचबरोबर कंपाऊंडिंग व्याजाचा फायदा अनुभव शकतात.

म्युच्युअल फंडाची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही फंडामध्ये जेवढा जास्त काळ पैसे गुंतवाल तितकीच अधिक कमाई तुम्ही करू शकाल. म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक योजना आहेत ज्यांनी एका वर्षात जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. आज आपण एचडीएफसीच्या एका म्युच्युअल फंडाबद्दल जाणून घेणार आहोत ज्या फंडाने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 79.73% परतावा मिळवून दिला आहे.

HDFC डिफेन्स फंड :
एचडीएफसीच्या डिफेन्स फंडणे मागील वर्षी गुंतवणूकदारांना 79.73% टक्क्यांपर्यंत चांगलाच परतावा मिळवून दिला आहे. त्याचबरोबर या म्युच्युअल फंडात एक वर्षा आधी गुंतवलेल्या 10 लाखांचे 17.97 लाख रुपये तयार केले आहेत. एचडीएफसीकडे उपलब्ध असणारे एनएवी 21.33 रुपये आणि फंड साइज 3996.82 करोडो रुपये एवढी आहे. एचडीएफसीचा हा म्युच्युअल फंड सेक्टरचा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.

डिफेन्स सेक्टरच्या एकूण किती कंपन्यांमध्ये पैसे लावले आहेत पाहूया :
एचडीएफसीच्या डिफेन्स फंडमध्ये गुंतवले जाणारे पैसे डिफेन्स सेक्टरच्या 21 कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये लावले जाणार आहेत. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, सोलर इंडस्ट्रीज इंडिया, हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड, टार्सन एंड टुब्रो, त्याचबरोबर एंटरग्लोब एव्हिएशनसारख्या 21 कंपन्या शामिल आहेत.

टॅक्सचे काही नियम देखील जाणून घ्या :
समजा तुम्ही एचडीएफसी डिफेन्स फंडात पैसे गुंतवून एका वर्षाच्या आतमध्येच काढत असाल तर, तुम्हाला 1% पर्यंत एक्झिट लोड देखील फेडावा लागेल. एवढेच नाही तर तुम्हाला 20% कॅपिटल गेन्स टॅक्स देखील भरावा लागेल. दरम्यान तुम्ही एका वर्षा नंतर पैसे काढत असाल आणि तुम्हाला मिळणारे रिटर्नची अमाऊंट 1.25 लाखांची असेल तर, तुम्हाला 12.5% टक्क्याच्या हिशोबाने टॅक्स भरावा लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HDFC Mutual Fund 06 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x