16 April 2025 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Mutual Fund SIP | नोकरदारांना 10 वर्षात करोडपती व्हायचं असल्यास प्रत्येक महिन्याला किती बचत करावी लागेल, फायद्याची अपडेट

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | भविष्यात पैशांची चणचण भासू नये त्याचबरोबर गरजेच्या वेळी आणि महत्त्वाच्या कामांकरिता इतरांकडे हाच पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी आत्तापासूनच गुंतवणुकीचे पर्याय शोधायला हवे.

बरेचजण सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून करोडोंचा फंड तयार करून ठेवतात. तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये चांगला निधी जमा करून ठेवायचा असेल तर, आत्तापासूनच थोडी थोडी गुंतवणूक आणि बचतीच्या मार्गावर चालणे गरजेचे आहे.

एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे हे फायद्याचे ठरेल :
तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक करणे सुरू कराल एकच तुमच्या भविष्यासाठी चांगलं असेल. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या अडचणी येत जात राहतातच. त्याचबरोबर आपलं वय वाढतं तसतस आपल्या शरीर आपल्याला कमी साथ देतं. त्यामुळे पैशांचं नियोजन आणि बचत आत्तापासूनच कमी गरजेचे आहे. जेणेकरून योग्य गुंतवणुकीमुळे तुमचे नंतरचे जीवन आनंदात जाईल.

अशा पद्धतीने गुंतवणूक करा :
समजा तुम्हाला एक कोटी रुपयांची रक्कम तयार करायची असेल तर, तुम्हाला आतापासूनच गुंतवणूक, बचत आणि खर्चाचे नियोजन सुरू करावे लागेल. तुम्ही व्यवस्थित आराखडा आखला तर, तुमच्यासाठी गुंतवणुकीचा पर्याय सोपा बनेल. जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर, फार कमी कालावधीतच एक कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता. कमीत कमी 10 वर्षांत तुम्ही करोडपती बनू शकता.

केवळ दहा वर्षांत एक कोटी रुपये तयार करायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 70,500 रुपये गुंतवावे लागतील. तरच तुम्ही एकूण 1,96,45,338 रुपये जमा करू शकाल. या एसआयपीमध्ये तुम्हाला वार्षिक व्याजदरानुसार 15% परतावा मिळेल.

योग्य ठिकाणी गुंतवणूक महत्त्वाची :
सध्याच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय गुंतवणूकदारांसमोर खुले आहेत. परंतु यामधील सर्वच पर्याय अधिकृत नाहीत. बऱ्याचवेळा गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक देखील होत असते. तुम्ही नवीनच पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर कोणत्याही व्यक्तीला पैसे देण्यापेक्षा तुम्ही थेट बँकांमध्ये जाऊन त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन गुंतवणुकी बाबतची संपूर्ण माहिती घेऊ शकता. ज्यामुळे तुमचे फसवणूक होण्याचे चान्सेस कमी होतील आणि तुम्हाला गुंतवणुकी बाबतची संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही एसआयपी त्याचबरोबर अनेक म्युच्युअल फंडांमध्ये देखील पैसे गुंतवू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP investment 06 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(268)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या