20 April 2025 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

RVNL Share Price | उच्चांकापासून 30% घसरलेला RVNL शेअर पुन्हा रॉकेट होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. दरम्यान, रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सुद्धा मोठी घसरण (NSE: RVNL) झाली होती. शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी हा शेअर 6.25 टक्के घसरून 448 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. दरम्यान, ईटी नाऊ वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी RVNL शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.

आरव्हीएनएल दुसऱ्या तिमाहीचे निकाल

दुसऱ्या तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २७ टक्क्यांनी घसरून २८६.९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ३९४.४ कोटी रुपये होता. RVNL कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीत कामकाजातून मिळणारे उत्पन्न ४,८५५ कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ४,९१४.३ कोटी रुपये होते. मागील ३ महिन्यांच्या कालावधीत RVNL कंपनी EBITDA ९ टक्क्यांनी घसरून २७१.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

शेअर प्राईस उच्चांकापासून 30 टक्क्यांनी घसरली

आरव्हीएनएल कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून RVNL शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. मागील १ वर्षात RVNL शेअरने १८० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तसेच २०२४ मध्ये आतापर्यंत या शेअरने १४८ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मात्र मागील एका महिन्यात हा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

आरव्हीएनएल शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक टेक्निकल चार्टनुसार आरव्हीएनएल शेअरने गेल्या काही महिन्यांत ४०० रुपयांच्या झोनकडे वाटचाल केली आहे, जी २०० दिवसांची सिंपल मूव्हिंग एव्हरेज आहे. इथून शेअरमध्ये हळूहळू तेजी पाहायला मिळेल. तज्ज्ञांनी RVNL शेअरसाठी ५४० ते ५५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ही टार्गेट प्राईस आरव्हीएनएल शेअरची उच्चांकी पातळी ठरू शकते.

मल्टिबॅगर परतावा दिला

मागील दोन वर्षांत आरव्हीएनएल शेअरने गुंतवणूकदारांना 789 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तसेच मागील तीन वर्षांत RVNL शेअरने 1048 टक्के आणि मागील ५ वर्षांत 17.95 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 09 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या