15 November 2024 7:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

CIBIL Score | सिबिल स्कोर वाढवायचा असेल तर या 4 टिप्स फॉलो करा, लोनसंबंधी कोणतीही अडचण भासणार नाही - Marathi News

CIBIL Score

CIBIL Score | सध्याची वाढती महागाई लक्षात घेता पैशांची गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु बऱ्याच सर्वसामान्य व्यक्तींना महिन्याच्या खर्चिक गोष्टींपासून गुंतवणुकीसाठी पैसे बाजूला काढता येत नाहीत. या कारणामुळे वेळेप्रसंगी लोन घेण्याची आवश्यकता आली तर, व्यक्ती पहिली धाव घेतो ती म्हणजे बँकेत. बँक आपल्याला लोन देईल या विश्वासाने तो बँकेत तर जातो परंतु काही कारणांमुळे लोन पास होत नाही.

तुमचं लोन अप्रूव होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सिबिल स्कोर. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुमचे लोन पास होऊ शकेल. अन्यथा तुम्हाला लोन मिळणार नाही. परंतु काळजी करू नका तुम्ही या 4 स्टेप्स फॉलो करून सिबिल स्कोर वाढवू शकता. चला तर जाणून घेऊया.

1. वेळेवर ईएमआय पेमेंट करा :

बऱ्याच व्यक्तींना ईएमआयवर वस्तू घेण्याची सवय असते. ईएमआयवर वस्तू घेऊन आणि डाऊन पेमेंट करून दिलेल्या कार्यकाळापर्यंत प्रत्येक हप्त्याला आपण वस्तूचे लोन फेडत राहतो. परंतु हीच वेळ चुकली तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस देखील द्यावे लागतात. या कारणामुळे तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. त्यामुळे लक्षपूर्वक ईएमआय वेळेवर भरत रहा.

2. एकापेक्षा जास्त लोन घेऊ नका :

समजा एखाद्या व्यक्तीने घरातील एखाद्या मौल्यवान वस्तूसाठी लोन काढलं असेल आणि लोन फेडण्याआधीच दुसऱ्या वस्तूसाठी लोनची मागणी केली असेल तर, अशा स्थितीत तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. त्यामुळे केवळ एक लोन फेडण्याकडे लक्ष द्या आणि नंतर दुसरे लोन घेऊन फेडा.

3. क्रेडिट कार्डची लिमिट :

तुम्ही कोणत्याही प्रकारचे क्रेडिट कार्ड घ्या. क्रेडिट कार्डला एक लिमिट असते. सिबिल स्कोर तुमच्या क्रेडिट कार्ड वापरण्यावरही कमी जास्त होत असतो. त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट वेळेवर करा. जेणेकरून तुमच्या सिबिल स्कोरवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

4. कमी काळासाठी लोन घेऊ नका :

समजा तुम्ही कमी काळात लोन फेडण्यासाठी कमी काळाचं लोन घेत असाल तर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला जास्तीचा ईएमआय भरावा लागू शकतो. ज्यामुळे तुमच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. असं केल्याने ईएमआय भरण्यास उशीर होण्याची देखील शक्यता वाढू शकते. हेच जास्त काळासाठी लोन घेतलं तर, तुम्हाला महिन्याला कमी ईएमआय भरावा लागेल. अशा स्थितीत तुमच्या सिबिल स्कोरवर वाईट परिणाम होणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | CIBIL Score 11 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x