22 November 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याने गुंतणूकदारांची चिंता वाढली आहे. बुधवारी बीएसई सेन्सेक्स 239.69 अंकांनी घसरून 78,435.49 अंकांवर (NSE: IREDA) पोहोचला होता. तर NSE निफ्टी 103.15 अंकांनी घसरून 23,780.30 अंकांवर पोहोचला होता. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.11 टक्के घसरून 188.45 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती

मागील ५ दिवसात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअर 9.65% घसरला आहे. तर गेल्या एका महिन्यात शेअरमध्ये 14.92% घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची वाढली आहे. त्यामुळे इरेडा शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे.

तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला

स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते इरेडा शेअरमध्ये येत्या एक ते दीड महिन्यात नकारात्मक ट्रेंड कायम राहू शकतो. सद्यस्थितीत १९२ रुपयांवर लो सपोर्ट (Low Support) आहे. शेअरचा स्विंग नीचांकी स्तर १८० ते १८५ रुपयांच्या दरम्यान असून, तो तुटण्याची शक्यता जास्त आहे. तसे झाल्यास इरेडा शेअर १४५ ते १५० रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. मात्र, लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून शेअर मजबूत परतावा देणारा ठरू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

इरेडा शेअरबाबत रणनीती

स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते इरेडा शेअर गुंतवणूकदारांनी येथे ऍव्हरेजिंग’साठी तयार राहणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे गुंतवणूकदारांना 150-160 रुपयांच्या आसपास इरेडा शेअरमध्ये पुन्हा एंट्री करण्याची संधी मिळू शकते. इरेडा शेअरमध्ये शॉर्ट टर्म टेन्शन शिल्लक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा १५०-१६० रुपयांच्या पातळीवर इरेडा शेअर खरेदी करणे योग्य ठरेल. शेअरमध्ये सध्या ४-५ टक्क्यांची करेक्शन आहे. परंतु मजबूत लाँग टर्म प्राइस स्ट्रक्चरमुळे इरेडा शेअर कमीत कमी १ वर्षाच्या कालावधीत पुन्हा २८०-२९० रुपयांच्या पातळीपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना इरेडा शेअरबाबत ‘बाय ऑन डिप्स’चे धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील ६ महिन्यात IREDA शेअरने 15.54% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात IREDA शेअरने 214.08% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 80.08% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 13 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x