25 November 2024 5:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | बुधवारी १३ नोव्हेंबरला सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर ८ टक्क्यांनी घसरून ५४.४९ रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी सुझलॉन शेअर 5 टक्के वाढून 56.73 रुपयांवर पोहोचला होता. मागील ५ दिवसात शेअरमध्ये २२ टक्क्यांची घसरण झाली आहे. मल्टिबॅगर सुझलॉन शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

शेअर टेक्निकल चार्टवर

स्टॉक मार्केट तज्ज्ञ म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सुझलॉन शेअर सेल झोनमध्ये आहे. शॉर्ट टर्मच्या दृष्टिकोनातून टेक्निकल चार्टवर सुझलॉन शेअर कमकुवत दिसत आहे. तज्ज्ञांनी सुझलॉन शेअरसाठी ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. तसेच 46 रुपयांवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. तसेच शॉर्ट टर्म ट्रेडिंग करणारे गुंतवणूकदार ५० ते ५१ च्या आसपास अधिक शेअर्स खरेदी करू शकतात.

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल खूप सकारात्मक होते. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने आपल्या आर्थिक अहवालात नमूद केले आहे की, 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत जुलै-सप्टेंबर तिमाहीत त्याचा एकत्रित निव्वळ नफा जवळपास दुप्पट झाला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १०२ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे.

सुझलॉन कंपनी ऑर्डरबुक

दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 2,121.23 कोटी रुपये झाले आहे, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते 1,428.69 कोटी रुपये होते. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा एबिटडा ३१ टक्क्यांनी वाढून २९४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सुझलॉन कंपनीची ऑर्डरबुक ५.१ गिगावॅट इतकी आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून 1166 मेगावॅटसाठी भारतातील सर्वात मोठी पवन ऊर्जेची ऑर्डर घेतल्याची पुष्टी केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 14 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x