22 April 2025 9:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. मागील काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर सातत्याने (NSE: IDEA) घसरत आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 43.85% घसरला आहे. मात्र गुरुवारी व्होडाफोन आयडिया शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.68 टक्के वाढून 7.41 रुपयांवर पोहोचला होता. दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचा तोटा कमी झाला आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी या शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

दुसऱ्या तिमाहीचे निकाल

दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचा एकत्रित तोटा ७,१७५.९ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत व्होडाफोन आयडिया कंपनीला ८,७४६.६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. व्होडाफोन आयडिया कंपनीने शेअर बाजारांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, दुसऱ्या तिमाहीत सेवांमधून मिळणारा एकत्रित महसूल 1.8 टक्क्यांनी वाढून 10,918.1 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 10,714.6 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचा एकत्रित ऑपरेटिंग महसूल वाढून १०,९३२.२ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत तो १०,७१६.३ कोटी रुपये होता.

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्म – रेटिंग अपडेट

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘न्यूट्रल’ रेटिंग कायम ठेवली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी १० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत १९.१५ रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांतील नीचांकी किंमत 7.32 रुपये होती. व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर मागील ५ दिवसांत 7.61 टक्के घसरला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचे एकूण मार्केट कॅप 51,508 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 14 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या