19 April 2025 2:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

EPFO Pension Money | पगारदारांनो आता चिंता करण्याची काही गरज नाही, महिन्याला मिळेल 10 हजार पेन्शन - Marathi News

EPFO Pension Money

EPFO Pension Money | ईपीएफओ अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे केंद्र सरकारकडून होणाऱ्या पगार वाढीवर कर्मचाऱ्यांना फायदाच फायदा अनुभवता येणार आहे. कारण की लवकरच सरकारकडून ईपीएफ लाभार्थी कर्मचाऱ्यांच्या 15,000 बेसिक सॅलरीवर हाईक केली जाणार आहे. ही पगार वाढ 15 हजारावरून 21 हजार रुपये केली जाणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळे त्यांच्या पेन्शनवर देखील चांगला परिणाम होताना दिसणार आहे. आता पगार वाढला म्हटल्यावर ईपीएस म्हणजेच एम्पलोयी पेन्शन स्कीम आणि ईपीएफ म्हणजेच एम्पलोयी प्रोविडेंट फंड. दोन्हीही भागांच्या योगदानात वाढ झाल्यामुळे तुम्हाला आधीपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकेल.

EPS मध्ये होईल योगदानाची वाढ :

सध्याच्या घडीला कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात त्याच्या पगारातील 12% रक्कमेचे योगदान केले जाते. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची बेसिक सॅल + DA या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. त्याचबरोबर कंपनीकडून देखील योगदान होते. ते देखील कर्मचाऱ्याच्या योगदाना एवढेच असते. ज्यामधील 8.33% EPS मध्ये आणि 3.67% EPF मध्ये जमा केली जाते.

15 आणि 20 हजाराचे कॅल्क्युलेशन :

1. कर्मचाऱ्याच्या 15 हजाराच्या बेसिक सॅलरीचे कॅल्क्युलेशन काढायचे झाले तर, 15000 x 8.33/100 = 1250 एवढे पैसे प्रत्येक महिन्याला तुमच्या पगारातून पीएफ खात्यात जमा होणार.
2. त्याचबरोबर नियमानुसार आणि होणाऱ्या निर्णयानुसार कर्मचाऱ्याला 21000 हजार रुपये मूळ पगार मिळाला तर, 21000 x 8.33/100 = 1749 आणि कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यात 1251 रुपये जमा होणार.

21000 रुपयांच्या बेसिक पगारावर किती पेन्शन मिळेल :

समजा एखाद्या व्यक्तीने त्याच्या 25 व्या वर्षी नोकरीची सुरुवात केली आणि पुढील 33 वर्ष नोकरी केली. म्हणजेच 58 व्या वर्षी रिटायरमेंट घेतली. एपीएसमधून बाहेर निघण्याच्या आधीच तुमचा मूळ पगार 21 हजार रुपये मांडला तर, कर्मचाऱ्यांचे 60 वर्षांचे वेतन, सरासरी मासिक वेतन या आधारावर कॅल्क्युलेशन केले जाते. केंद्र सरकारकडून ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांच्या पंधरा हजार बेसिक सॅलरीची लिमिट लवकरच 21000 रुपये करण्यात येणार आहे.

पेन्शन मोजण्याचे सूत्र :

मासिक पेन्शन x पेन्शन योग्य सेवा / 70. या सूत्राच्या आधारे तुम्हाला रिटायरमेंटनंतर किती पेन्शन मिळणार हे समजून येईल. म्हणजेच 15000 x 33/70 = 7071 रुपये. तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10 हजारांच्या रेंजमध्ये पेन्शन उत्पन्न होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Pension Money 17 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Pension Money(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या