16 November 2024 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News
x

Jio Finance Share Price | शेअरची रॉकेट तेजी वाढणार, जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अजून एक अपडेट - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आणि झोमॅटो लिमिटेड कंपनी निफ्टी 50 निर्देशांकात सामील होण्याची शक्यता अधिक (NSE: JIOFIN) वाढली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आणि झोमॅटो लिमिटेड या कंपन्या अलीकडेच एनएसई F&O सेगमेंटमध्ये सामील झाल्या आहेत, जी निफ्टी 50 मध्ये स्थान मिळवण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्म रिपोर्ट

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या निफ्टी निर्देशांकाच्या अपडेट दरम्यान जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि झोमॅटो लिमिटेड या कंपन्यांचा निफ्टी ५० मध्ये समावेश होऊ शकतो. जेएम फायनान्शिअलने पुढे म्हटले आहे की, ‘F&O सेगमेंटमध्ये सामील झाल्यानंतर जिओ फायनान्शियल आणि झोमॅटो कंपन्यांची निफ्टी 50 मध्ये सामील होण्याची शक्यता आणखी मजबूत झाली आहे.

गुंतवणुकीची क्षमता

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्म रिपोर्टनुसार, ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीमध्ये जवळपास 3,140 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते. झोमॅटो लिमिटेड निफ्टी ५० मध्ये सामील झाल्यानंतर म्युच्युअल फंडातून सुमारे ५,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि झोमॅटो लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये जवळपास ८,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, जे कंपन्यांच्या गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत आहेत.

हे शेअर्स निफ्टीतून बाहेर पडू शकतात

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मनुसार, ‘बीपीसीएल आणि आयशर मोटर्सचे शेअर्स निफ्टी ५० निर्देशांकातून बाहेर पडू शकतात. बीपीसीएल आणि आयशर मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्समधून अनुक्रमे १,८८२ कोटी आणि २,०१७ कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते.

शेअरने किती परतावा दिला

मागील १ महिन्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर 4.21% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 9.98% घसरला आहे. मागील १ वर्षात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने 40.82% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने 36.26% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 16 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x