19 April 2025 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News

Money Formula

Money Formula 12X30X12 | संपूर्ण देशात करोडोंच्या संख्येने व्यक्ती पैशांच्या गुंतवणुकीकरिता एसआयपी माध्यम निवडतात. एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही योजना एक प्रकारची मार्केट लिंक्ड योजना आहे. परंतु यामध्ये शेअर मार्केटपेक्षा कमी जोखीम असते. याच कारणामुळे आपले पैसे डबल करण्यासाठी लोक एसआयपी माध्यम निवडतात.

त्याचबरोबर एसआयपीमध्ये पैसे गुंतवण्याचे व्याजासकट बरेच फायदे तुम्हाला अनुभवायला मिळतात. ही योजना लॉन्ग टर्म योजना असून तुम्ही दीर्घकाळापर्यंत भडगंज फंड जमा करून ठेवू शकता. एवढंच नाही तर, कमल 500 रुपयांपासून सुरू होणाऱ्या गुंतवणुकीत तुम्ही करोडो रुपये कमवू शकता. अशातच आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त फॉर्मुला सांगणार आहोत. त्याच्या वापराने तुम्ही एसआयपीच्या माध्यमातूनच झटपट करोडपती बनू शकाल. चला तर पाहूया हा फॉर्मुला नेमका आहे तरी काय.

करोडपती बनण्याचा 12X30X12 हा फॉर्मुला आहे जबरदस्त :

या फॉर्मुल्यामुळे तुम्ही SIP च्या माध्यमातून भरपूरसारे पैसे गुंतवण दीर्घकाळात श्रीमंत बनू शकता. सर्वप्रथम आपण फॉर्मुल्याचा अर्थ जाणून घेऊया. 12X30X12 याचा अर्थ 12 म्हणजे 12% वार्षिक टॉप अप. म्हणजे तुम्ही हजार रुपयांपासून सुरू करत असाल तर, प्रत्येक वर्षाला तुम्हाला 12% ने टॉप अप करावं लागेल. त्यानंतर 30 म्हणजे तुम्हाला एकूण 30 वर्ष एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची आहे आणि शेवटचे 12 म्हणजे एसआयपीवर मिळणाऱ्या 12% परताव्याचे आहेत.

अशा पद्धतीने फॉर्मुला बनवेल करोडपती :

समजा एखाद्या व्यक्तीने 1000 रुपयांपासून एसआयपीमध्ये गुंतवणूक केली असेल संपूर्ण एक वर्ष ही गुंतवणूक 1000 रुपये राहील. फॉर्मुल्यानुसार 12% अमाऊंट म्हणजे 120 रुपये. पुढच्या वर्षी 1,120 रुपये प्रत्येक महिन्याला एसआयपीमध्ये गुंतवायचे. त्यानंतर 1,120 रुपयांवर 12% म्हणजे 134 रुपये. म्हणजेच तिसऱ्या वर्षी तुम्ही 1,134 रुपयांची गुंतवणूक कराल. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक वर्षाला 12% हिशोबाने पैसे वाढवत एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू ठेवू शकता.

अशा पद्धतीने तुमची एसआयपी एकूण 30 वर्ष सुरू राहील. म्हणजेच 30 वर्षांत तुम्ही टॉप अप करून एकूण 28,95,992 रुपयांची गुंतवणूक कराल. त्यानंतर 12% परताव्यानुसार तुम्हाला 83,45,611 रुपये मिळतील. म्हणजेच तुमचा एकूण फंड 1,12,41,603 रुपये मिळतील. त्यामुळे करोडपती बनण्यासाठी तुम्हाला या फॉर्मुल्याचा वापर करावा लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Money Formula 12x30x12 16 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Money Formula(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या