17 November 2024 4:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News SIP Calculator | 5 आणि 10 हजाराच्या SIP ने एकूण 10 वर्षांत किती पैसे जमा होतील, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन - Marathi News
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत सकारात्मक संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | CLSA ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की बाजार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या 40 अब्ज डॉलरच्या नवीन ऊर्जा व्यवसायाकडे दुर्लक्ष (NSE: RELIANCE) करीत आहे. सौर ऊर्जा क्षेत्राचा व्यवसाय जवळपास 43 अब्ज डॉलर्सचा आहे. तथापि, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स CLSA ब्रोकरेज फर्मच्या रेनी-डे मूल्यांकनाच्या 5% च्या आत व्यवहार करीत आहेत. याशिवाय एअरफायबर ग्राहकांमध्ये लक्षणीय वाढ आणि संभाव्य आयपीओमुळे २०२५ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी व्यवसायाचे पुनर्मूल्यांकन होण्याची शक्यता आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)

शेअरला ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग

ब्रोकरेज फर्म सीएलएसए’ने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी सीएलएसए ब्रोकरेज फर्मने 1,650 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. याबाबत सीएलएसए ब्रोकरेज फर्मने म्हटले की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्स कंजर्वेटिव मूल्याच्या 5 टक्क्यांच्या आत असून शेअरला 2025 मध्ये अनेक ट्रिगर्स दिसतील.

सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या मते, रिलायन्स ग्रुपच्या सोलर पीव्ही गिगाफॅक्टरीचे लवकरच लॉन्चिंग होणार आहे. तज्ज्ञांचा मते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीसाठी हा एक ट्रिगर आहे, ज्याकडे मार्केट दुर्लक्ष करतंय. तसेच पीअर व्हॅल्युएशननुसार, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या सौर व्यवसायाचे मूल्य 30 अब्ज डाॅलर आहे आणि एकूण नवीन ऊर्जा व्यवसायाचे मूल्य 43 अब्ज डाॅलर आहे जे कंपनीसाठी सकारात्मक संकेत देतंय आणि गुंतवणूकदारांसाठी सुद्धा फायद्याचं आहे.

मल्टिबॅगर परतावा दिला

मागील १ महिन्यात हा शेअर 6.60% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 11.76% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 7.57% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 73.90% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 4,678.95% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 16 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x