19 November 2024 2:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर प्राईस 55% घसरली, आता तेजीचे संकेत, ICICI ब्रोकरेज बुलिश - NSE: IDEA HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर फोकसमध्ये, आली मोठी अपडेट, शेअर पुन्हा मजबूत परतावा देणार - NSE: IRFC SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. एका नवीन कंपनीचा आयपीओ लवकरच लाँच होणार आहे. मागील वर्षभरात अनेक आयपीओ गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत आहेत. आता एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी आयपीओ लाँच करणार आहे.

एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी आयपीओ २२ नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होईल. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी आयपीओ २६ नोव्हेंबरला बंद होईल. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स आयपीओ २१ नोव्हेंबरला अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी 140-148 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.

4 कोटी शेअर्सचा नवा इश्यू

एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये ३.८७ कोटी इक्विटी शेअर्सचे नवे इश्यू आणि प्रवर्तकांनी ५२.६८ लाख शेअर्सच्या विक्रीची ऑफर दिली आहे. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनी कर्मचाऱ्यांसाठी १ लाख इक्विटी शेअर्स राखीव ठेवले आहेत. आयपीओमधून मिळणारी अर्धी रक्कम पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, १५% बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित ३५% रक्कम रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

कंपनी पैसे कुठे वापरणार?

एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी वर्किंग कॅपिटलच्या गरजेपोटी १८१ कोटी रुपये आणि ६० एमएलडी एसटीपी बांधण्यासाठी ३० कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी १२० कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी करणार आहेत. हेम सिक्युरिटीज कंपनी या आयपीओ’ची एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहे, तर बिगशेअर सर्व्हिसेस आयपीओ’साठी रजिस्ट्रार आहे.

कंपनी बद्दल

एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि पाणी पुरवठा प्रकल्पांचे डिझाइन, बांधकाम, ऑपरेशन आणि देखभाल करण्यात माहिर आहे. गेल्या सात वर्षांत कंपनीने भारतभर असे २८ प्रकल्प विकसित केले आहेत. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक 1,906.3 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP Enviro Infra Engineers Ltd 19 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(127)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x