19 November 2024 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Enterprises Share Price | शेअर प्राईस 66 रुपये, 1018% परतावा देणारा शेअर पुन्हा तेजीत - NSE: RTNINDIA NBCC Share Price | 263% परतावा देणारा NBCC शेअर पुन्हा मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NBCC Samvardhana Motherson Share Price | 205525% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON SJVN Share Price | 3 सहित हे या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Post Office Scheme | अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे फायद्याची; पैसे एकदाच गुंतवा आणि प्रतिमहा मिळवा 9250 रूपये Salary Management | तरुणपणीच्या 'या' 5 आर्थिक चुकांमुळे भविष्य अंधारात जाईल, श्रीमंतीचा मार्ग थांबून खडतर प्रवास सुरू होईल EPFO Passbook | पगारदारांनो, 30 हजार पगार असणाऱ्यांच्या EPF खात्यातही 2 करोडची रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट
x

Salary Management | तरुणपणीच्या 'या' 5 आर्थिक चुकांमुळे भविष्य अंधारात जाईल, श्रीमंतीचा मार्ग थांबून खडतर प्रवास सुरू होईल

Salary Management

Salary Management | प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यात उंच उंच स्वप्न पाहतो. स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचं रान करण्याची देखील तयारी दाखवतो परंतु नवीनच नोकरीला लागल्यानंतर अति आत्मविश्वासामुळे काही चुका करून बसतो. सुरुवातीच्या काळात चुकीच्या ठिकाणी पैसे उडून पश्चातापाची वेळ येऊ शकते. त्यामुळे तुम्ही सुद्धा तरुण वयात असाल आणि सॅलरी मॅनेज करून बचत करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी केवळ तुमच्यासाठी.

तुम्ही तुमच्या 5 सवयींवर काम करून लवकरात लवकर श्रीमंतीचा मार्ग शोधून काढू शकता. चला तर जाणून घेऊया.

श्रीमंत असल्याचे ढोंग :

सध्याच्या पिढीची तरुण मंडळी स्वतःला श्रीमंत दाखवण्याच्या नादात सर्रासपणे पाहायला मिळते. महागडा रेस्टॉरंटमध्ये उठणे-बसणे, महागडी दारू पिणे, सिगारेट ओढणे, महागडे बूट, कपडे, गाडी या सर्व शो शाइनिंगमध्ये पैसे बरबाद करणे. या सर्व गोष्टी करणे आजच्या तरुण पिढीला आवडत जरी असले तरीसुद्धा येणारा काळ त्यांच्यासाठी खडतर बनू शकतो. कारण की श्रीमंत असणे आणि श्रीमंत असल्याचं ढोंग करणे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे या मोहमायापासून दूर राहणे फायद्याचे ठरेल. त्याऐवजी तुम्ही शक्य तितके आणि गरजेपुरते पैसे खर्च करा.

आरोग्य विमा खरेदी करण्याचा विचार न करणे :

आरोग्य संबंधित किंवा आपत्कालीन घटना कोणत्याही व्यक्तीबरोबर होऊ शकते. जर तुमच्या पाठीमागे तुमचं कुटुंब असेल आणि संपूर्ण कुटुंब केवळ तुमच्या पगारावर चालत असेल तर, तुम्ही आरोग्य विमा खरेदी करणे अत्यंत गरजेचे आहे. आजकालची तरुण पिढी आरोग्य विमा खरेदी करण्याचा अजिबात विचार करत नाही. त्याऐवजी ते वायफळ गोष्टींमध्ये पैसे खर्च करण्याचा विचार करतात आणि ऐन वेळेला पश्चाताप सहन करतात.

कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करणे :

नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो परंतु हा पगार पुढील 5 ते 6 दिवसांत कुठे गायब होतो याचा पत्ता देखील लागत नाही. त्यामुळे घरातील काही खर्चिक गोष्टींसाठी किंवा महत्त्वाच्या कामांसाठी, अडचणीसाठी ऐन वेळेला पैसा उभा करणे ही एक प्रकारची समस्या ओढावते. अशावेळी तरुण मंडळी बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी धावा करतात किंवा स्वतःच्या पीएफ खात्यातील पैसे मोडून ते वापरतात.

परंतु असं करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पगारातील एक ठराविक रक्कम एखाद्या चांगल्या व्याजदराच्या योजनेमध्ये गुंतवली पाहिजे. असं केल्याने प्रत्येक महिन्याला तुम्ही थोडी थोडी रक्कम बाजूला काढून दीर्घकाळापर्यंत एक मोठा फंड देखील तयार करू शकता. यासाठी मार्केटमध्ये एसआयपी, म्युच्युअल फंड, पोस्टाच्या विविध योजना त्याचबरोबर इतरही सरकारी योजना उपलब्ध आहेत.

बचत न करणे :

सध्याच्या काळातील मुलं आपले पैसे बचत करणे ऐवजी सिगारेट, दारू, मोठमोठ्या पार्ट्या त्याचबरोबर गेमिंग, ओटीपी प्लॅटफॉर्मवरचे वेब सिरीज पाहण्यासाठी त्याचबरोबर इतर आणखीन वायफळ गोष्टींसाठी आणि काही क्षणांपुरत्या मजेसाठी खर्च करतात. त्याऐवजी या सर्व प्रकारच्या वाईट सवय सोडून तुम्ही हेच पैसे बचत करण्यासाठी वापरले पाहिजे. तुम्ही अगदी छोट्या मनी बँकमधून बचतीची सवय लावली पाहिजे.

स्वतःचे शौक पूर्ण करण्यासाठी कर्ज काढणे :

आजच्या काळात अगदी कोणत्याही व्यक्तीला बँकेतून कर्ज काढण्यासाठी बँकेने सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही तुमच्या गरजेसाठी म्हणजेच घरासाठी, आपत्कालीन घटनांसाठी, शिक्षणासाठी, लग्न खर्चासाठी कर्ज काढू शकता. कारण की ही तुमची महत्त्वाची गरज आहे. परंतु तुम्ही तुमचे छंद जोपासण्यासाठी म्हणजेच प्रवासासाठी, यात्रा करण्यासाठी, आय फोनसारखे महागडे फोन घेण्यासाठी, बाईक घेण्यासाठी चक्क कर्ज काढत असाल तर, ही गोष्ट तुम्हाला भविष्यात तोंडावर पाडू शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Salary Management 19 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Salary Management(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x