20 November 2024 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Locker | HDFC, SBI आणि ICICI बँक ग्राहकांना 'या' महत्त्वाच्या वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवता येणार नाही, वाचा संपूर्ण डिटेल्स GMP IPO | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधीचा फायदा घ्या - IPO GMP FD Interest Rate | स्वतःच्या नाही तर पत्नीच्या नावाने सुरू करा FD; पैसे वाचतील, टीडीएसवर देखील मिळेल सूट - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर फोकसमध्ये आला, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, यापूर्वी 1689% परतावा दिला - NSE: RVNL Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र FD नव्हे, तर बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 1 वर्षात 42% परतावा देईल - NSE: MAHABANK Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, 38 टक्क्याने स्वस्त झालाय शेअर - NSE: SUZLON Family Pension | मुलींनो कौटुंबिक पेन्शनवर तुमचा सुद्धा हक्क; निवृत्ती वेतनाबाबतचे नियम लक्षात ठेवा, आजीवन पेन्शन मिळेल
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत फायद्याची अपडेट, 3892% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकस मध्ये आला आहे. टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने भूतानमध्ये 5,000 मेगावॅट स्वच्छ ऊर्जा क्षमता विकसित करण्यासाठी मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या (NSE: TATAPOWER) केल्या आहेत. भूतानच्या ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनी सोबत टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने हा करार केला आहे. ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ही ड्रुक होल्डिंग अँड इन्वेस्ट्मेन्ट्स लिमिटेड कंपनीची उपकंपनी आहे. विशेष म्हणजे भूतान देशातील ही एकमेव वीज निर्मिती कंपनी आहे. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)

टाटा पॉवर कंपनीने काय माहिती दिली

टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने माहिती देताना सांगितले की, ‘टाटा पॉवर लिमिटेड आणि ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातील हा करार आशियातील स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी भागीदारी आहे. या दोन्ही कंपन्यांमधील करारांतर्गत किमान 5,000 मेगावॅटचे अक्षय ऊर्जा प्रोजेक्ट विकसित केले जातील. या करारात 1,125 मेगावॅट क्षमतेच्या दोरजिलुंग जलविद्युत प्रकल्पासह 4,500 मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रोजेक्टचा समावेश आहे. तसेच, टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचीची उपकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड 500 मेगावॅटचे सौर प्रोजेक्ट विकसित करेल.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटले

टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे CEO प्रवीर सिन्हा म्हणाले की, ‘ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीसह टाटा पॉवर लिमिटेड कंपनीची भागीदारी या प्रदेशातील प्राधान्यकृत स्वच्छ ऊर्जा प्रकल्प म्हणून आमची प्रतिष्ठा मजबूत करते. दोन्ही कंपन्या मिळून एकत्रितपणे 5,000 मेगावॅट स्वच्छ ऊर्जा क्षमता निर्माण करू. ही भागीदारी भूतानची जलविद्युत क्षमता वापरण्यास आणि दोन्ही देशांच्या वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यात मोठी मदत करेल.

शेअरने 3,892.16% परतावा दिला

मागील १ महिन्यात टाटा पॉवर शेअर 10.27% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 7.81% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा पॉवर शेअरने 56.11% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 638.35% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना टाटा पॉवर शेअरने 3,892.16% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 23.28% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price 20 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x