24 November 2024 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक

Post Office Interest

Post Office Maximum Interest | पोस्ट ऑफिस अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात. नॅशनल सेविंग सर्टिफिकेटपासून ते सुकन्या समृद्धी योजना पर्यंत विविध प्रकारच्या योजना चालवून आणि गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळवून देऊन लोकप्रिय ठरलेल्या पोस्टाच्या एकूण 9 योजना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देतात. आज आपण या नावाजलेल्या 9 योजनांच्या गुंतवणुकीपासून ते व्याजदरापर्यंत सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम :

या योजनेचे व्याजदर 8.60% असून आतापर्यंत बऱ्याच ज्येष्ठांनी योजनेत पैसे गुंतवून स्वतःचं भविष्य सुरक्षित केलं आहे. योजनेमध्ये तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. त्याचबरोबर जास्तीत जास्त पैसे गुंतवणुकीची लिमिट 15 लाख रुपये दिली आहे. दरम्यान गुंतवणूकदारांना 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील अनुभवता येतो.

सुकन्या समृद्धी योजना :

ही योजना खास करून मुलींसाठी तयार केली गेली आहे. मुलींचं शिक्षण त्यांचं लग्न त्याचबरोबर त्यांचं पुढील भवितव्य उज्वल करण्यासाठी या योजनेचा विचार तुम्ही करू शकता. योजनेमध्ये पैसे गुंतवणुकीची लिमिट कमीत कमी 250 सर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये आहे. त्याचबरोबर योजनेचे सध्याचे व्याजदर 8.40% असून 80C अंतर्गत कर सवलत देखील मिळते.

सेविंग अकाउंट :

पोस्टाच्या सेविंग अकाउंट या योजनेने देखील गुंतवणूकदारांना चांगली रक्कम मिळवून दिली आहे. ही योजना तुम्ही केवळ 20 रुपयांपासून देखील सुरू करू शकता. त्याचबरोबर गुंतवणुकीची लिमिट दिली गेली नाहीये म्हणजेच तुम्ही तुम्हाला हवं तेवढी गुंतवणूक जमा करू शकता. सेविंग अकाउंटमध्ये तुम्हाला 4.00% टक्क्यांनी व्याजदर प्रदान केले जाते. परंतु या योजनेवर तुम्हाला टॅक्स सूटचा लाभ मिळणार नाही.

रिकरिंग डिपॉझिट :

पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिटवर देखील कर सवलत मिळणार नाहीये. दरम्यान या योजनेत तुम्ही केवळ 10 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीची लिमिट दिली गेली नाहीये. योजनेचे व्याजदर 7.20% आहे. व्याजदर जास्त असल्यामुळे आणि गुंतवणुकीची लिमिट दिली गेली नसल्यामुळे तुमच्याकडून टॅक्स वसुलले जाऊ शकतात.

किसान विकास पत्र :

देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी बनवली गेलेली ही योजना अत्यंत फायद्याची आहे. ही योजना शेतकऱ्यांना 7.60 टक्क्यांनी योग्य व्याजदर देते. योजनेमध्ये 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू करून तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता. परंतु यावर देखील तुम्हाला टॅक्स सवलत मिळणार नाही.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम :

पोस्टाच्या योजनेतून तुम्ही कमीत कमी 1500 रुपयांची गुंतवणूक करून जास्तीत जास्त सिंगल खात्यात 9 लाख तर, जॉईंट खात्यात 4.5 लाख रुपये गुंतवू शकता. यावर तुम्हाला कर सवलत मिळणार नाही. अनेक नागरिकांनी पोस्टाच्या मंथली इनकम स्कीमचा भरभरून लाभ घेतला आहे. नोकरदार वर्गांसाठी पोस्टाची ही योजना अत्यंत फायद्याची आहे.

टाईम डिपॉझिट :

पोस्टाची टाईम डिपॉझिट ही योजना देखील कमालीची आहे. योजनेमध्ये तुम्ही कितीही पैसे गुंतवू शकता. त्याचबरोबर गुंतवणुकीची सुरुवात केवळ 200 रुपयांपासून सुरू करू शकता. योजनेचे व्याजदर 6.90 ते 7.70 च्या दरम्यान असते. यामध्ये 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड :

पोस्टाच्या या योजनेचे व्याजदर 7.90% आहे. योजनेवर टॅक्स सूटचा लाभ मिळतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता आणि कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Interest 24 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Post Office Interest(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x