24 November 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | शेकडो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. बऱ्याचदा प्रवाशांचं काही कारणांमुळे तिकीट कॅन्सल करावं लागतं. तिकीट कॅन्सलेशनचे प्रवाशाला पैसे देखील भरावे लागतात. बऱ्याच व्यक्तींना तिकीट कॅन्सलेशनचे चार्जेस किती घेतले जातात याची देखील कल्पना नसते. दरम्यान रेल्वेने प्रवाशाचे तिकीट वाया जाऊ नये त्याचबरोबर त्याला कोणताही प्रकारचे चार्जेस भरावे लागू नये यासाठी एक भन्नाट ट्रिक आणली आहे. ती म्हणजे तिकीट ट्रान्सफर.

तिकीट ट्रान्सफर केल्यानंतर कोणत्या सुविधा मिळतात :

तुम्हाला तिकीट काढून सुद्धा प्रवास करायचा नसेल तर, तुम्ही तिकीट ट्रान्सफर करण्याचं ऑप्शन निवडू शकता. तिकीट ट्रान्सफर केल्यानंतर तुमच्याकडून तिकीट कॅन्सल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जाणार नाहीत.

अशा पद्धतीने करता येईल तिकीट ट्रान्सफर :

तुमचे तिकीट ऑनलाईन असो किंवा तुम्ही तिकीट काउंटरवरून तिकीट घेतलेले असो. ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला तिकीट काउंटरवर तिकिटाची प्रिंट आणि तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावे तिकीट ट्रान्सफर करत आहात त्याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील. त्या तिकिटावरून तुमचं नाव काढून ट्रान्सफर झालेल्या व्यक्तीचे नाव लिहिले जाते.

कोणासाठी करू शकतात तिकीट ट्रान्सफर :

तुम्ही कॅन्सल केलेल्या तिकीट आला ट्रान्सफर करण्यासाठी केवळ तुमच्या घरातील सदस्यांवरच ट्रान्सफर करू शकता. इतर कोणताही व्यक्ती या सुविधेस पात्र ठरू शकत नाही. यामध्ये तुमचे आई-वडील, भाऊ-बहीण किंवा घरामधील इतर कोणताही सदस्य तिकीट ट्रान्सफरसाठी पात्र ठरू शकतो.

ट्रान्सफरची वेळ काय :

तुम्हाला तिकीट ट्रान्सफर करायचं असेल तर ट्रेन सुरू व्हायच्या 24 तासांआधी तिकीट ट्रान्सफर करून घ्यावे लागेल. आता बऱ्याच व्यक्तींना असा देखील प्रश्न पडला असेल की बोर्डिंग स्टेशन बदलता येते की नाही. तरी याचे उत्तर होय आहे. तुम्ही तुमचं बोर्डिंग स्टेशन देखील बदलून घेऊ शकता परंतु यासाठी तुम्हाला आय आरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटला लॉगिन करावं लागेल. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने बुक केलेल्या तिकिटाचे बोर्डिंग स्टेशन बदलता येऊ शकत नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Railway Ticket Booking 21 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(47)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x