25 November 2024 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
x

Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई

Smart Investment

Smart Investment | आपल्याला लहान मुलाच्या आयुष्याची तसेच भविष्याची चिंता प्रत्येक आई-वडिलांना असते. सध्याच्या काळात शिक्षण प्रचंड महागले आहे. चांगल्या दर्जाचे आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक पालक आपल्या मुलांसाठी लाखो रुपयांची फी भरून मुलाला चांगल्या ट्युशनमध्ये त्याचबरोबर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात. परंतु प्रत्येक पालकाची आर्थिक स्थिती हवी तशी मजबूत नसते.

आज या बातमीपत्रातून आम्ही तुम्हाला एका अशा पॉलिसीची सांगड घालून देणार आहोत जी तुमच्या मुलाचं भविष्य उज्वल बनवण्यास मदत करू शकते. ही पॉलिसी भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसी अंतर्गत येते. या पॉलिसीचे नाव (Jeevan Tarun policy) असं आहे.

जीवन तरुण पॉलिसीची प्रमुख उद्दिष्टे :

1. एलआयसीची जीवन तरुण पोलिसी ही एक स्वतंत्र, नॉन लिंक, पार्टिसिपेटिंग आणि लाईफ इन्शुरन्स सेविंग प्लॅनमध्ये मोडते.
2. पॉलिसीची विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला पॉलिसीचा लाभ घेताना इन्शुरन्सचा फायदा देखील अनुभवता येऊ शकतो.
3. पॉलिसीने पैसे गुंतवणुकीकरिता लहान मुलांचे वय 90 दिवस ते 12 वर्ष ठेवले आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलाचं 20 वय होईपर्यंत पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता.
4. ही पॉलिसी तुमच्या मुलाच्या 25 व्या वर्षी मॅच्युअर होते.

दररोज वाचवा 150 रुपये :

तुम्हाला तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी लवकरात लवकर पैसे डबल करायचे असतील तर तुम्ही एलआयसीच्या जीवन तरुण पॉलिसीमध्ये कोणताही विचार न करता गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवसाला 150 रुपयांची बचत करायची आहे. तसं पाहायला गेले तर आपण प्रत्येक दिवसाला 200 ची नोट अगदी सर्रासपणे खर्च करतो. त्याऐवजी तुम्ही पॉलिसीमध्ये पैसे लावू शकता.

समजा एखाद्या व्यक्ती त्याच्या 12 वर्षीय मुलासाठी एलआयसीची ही पॉलिसी खरेदी करत आहे. तुम्ही प्रत्येक दिवसाला 150 रुपयांची बचत करून वर्षाला 55,000 रुपये साठवता. तुम्हाला दररोज 150 रुपयांची गुंतवणूक तुमच्या मुलाच्या 20 व्या वर्षीपर्यंत सुरू ठेवायची आहे. एकूण 8 वर्ष प्रत्येक वर्षाला 55,000 रुपयांची जमवाजमाव करून तुमच्या खात्यात 4,40,665 रुपये जमा होतील. म्हणजेच पॉलिसी पूर्णपणे मॅच्युअर झाल्यानंतर 2,47,000 एवढे रुपये बोनस स्वरूपात प्राप्त होतील.

त्याचबरोबर 97,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस देखील देण्यात येईल. म्हणजेच 25 वर्षे होईपर्यंत तुम्ही केलेली गुंतवणूक 4,40,665 रुपये असेल आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी एकूण रक्कम 8,44,500 रुपये मिळतील. म्हणजेच तुम्ही 4 लाखांपेक्षा अधिक एक्स्ट्रा रक्कम कमावू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment Jeevan Tarun Policy 25 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x