21 November 2024 6:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरणार की तेजीने परतावा देणार, महत्वाची अपडेट - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर मागील काही दिवसांपासून सात्यत्याने (NSE: IDEA) घसरत आहे. गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मच्या मते व्होडाफोन आयडिया शेअर २.४० रुपयांपर्यंत घसरू शकतो. म्हणजे व्होडाफोन आयडिया शेअर सध्याच्या किमतीपेक्षा ६६ टक्क्यांनी घसरू शकतो असे संकेत दिले आहेत. गुरुवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.25 टक्के घसरून 6.94 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

एकाबाजूला यापूर्वी नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने अडचणीत सापडलेल्या व्होडाफोन आयडिया शेअरसाठी २.२ ते २.५ रुपये टार्गेट प्राइस दिली होती. मात्र, आता नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरसाठी 14 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्म आणि नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्म यांच्या सल्ल्यामुळे गुंतवणूकदार अधिक अडचणीत सापडले आहेत असं म्हणावं लागेल.

दुसऱ्या तिमाही निकाल

व्होडाफोन आयडिया कंपनीने दुसऱ्या तिमाहीत निकालात अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केल्याने शेअर अजून घसरतो आहे. दुसऱ्या तिमाहीच्या निकालात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनीने जुलैमध्ये दरवाढीनंतर प्रति वापरकर्ता सरासरी महसुलात (एआरपीयू) वाढ झाल्यामुळे कंपनीचा एकत्रित तोटा ७,१७५.९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

दरवाढीमुळे व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने आपले ग्राहक गमावले असले तरी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुंद्रा यांनी भांडवलाचा खर्च भरून काढण्यासाठी आणखी एक दरवाढ करण्याचे संकेत दिले आहेत.

व्होडाफोन इंडिया लिमिटेड कंपनीने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत सुमारे ३.६ अब्ज डॉलर (अंदाजे ३०,००० कोटी रुपये) करार केला आहे. दूरसंचार कंपनी ३ वर्षांच्या कालावधीत उल्लेखकेलेल्या कंपन्यांना नेटवर्क उपकरणे पुरवेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 21 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x