22 November 2024 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund Investment | गुंतवणुकीच्या साधनांपैकी म्युच्युअल फंड तसेच SIP गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. कारण की म्युच्युअल फंडमध्ये केवळ 100 ते 200 रुपयांपासून बचत करून आपण एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकतो. दीर्घकालीन गुंतवणूक असेल तर, तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा देखील अनुभवता येतो. आज आम्ही एसबीआयच्या अशाच एका फंडाविषयी माहिती सांगणार आहोत. ज्याने आतापर्यंत बऱ्याच गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं आहे.

SBI हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज फंड :

एसबीआयचा हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड दीर्घकाळात मोठी रक्कम जमा करून ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायद्याचा फंड आहे. यामधून तुम्ही 2500 रुपयांची एसआयपी सुरू करू शकता. हा फंड 25 वर्ष जुना असल्यामुळे सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला म्युच्युअल फंड आहे. गेल्याच वर्षी एसबीआयच्या हेल्थकेअर अपॉर्च्युनिटी फंडाने गुंतवणूकदारांना 37% परतावा मिळवून दिला आहे.

म्युच्युअल फंडाची सुरुवात कधी झाली :

सांगितल्याप्रमाणे योजना 25 वर्ष जुनी आहे. या म्युच्युअल फंडाची सुरुवात 1999 साली 5 जुलै या तारखेला झाली. लॉन्चिंगपासून ते आत्तापर्यंत गुंतवणूकदारांनी छप्परफाड कमाई केली आहे.

2500 रुपयांच्या SIP मधून करोडोंची रक्कम कशी तयार होईल :

या जबरदस्त म्युच्युअल फंडाने लॉन्चिंगपासून ते आत्तापर्यंत ग्राहकांना 18.27% एवढा घसघशीत परतावा दिला आहे. समजा एखाद्या व्यक्तीने फंडाच्या लॉन्चिंगपासून 2500 रुपयांची गुंतवणूक केली असती तर, सध्याच्या घडीला तो व्यक्ती करोडपती असता. त्याच्याकडे आता 1.18 करोडो रुपयांची रक्कम जमा झाली असती.

गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन सविस्तर समजून घ्या :

समजा गुंतवणूकदाराने 2500 रुपयांची गुंतवणूक सुरू केली असती तर, 25 वर्षांत 7.50 लाख रुपयांची रक्कम जमा झाली असती. या गुंतवणुकीवर तुम्हाला 1.10 करोड रुपये व्याजाचे मिळतात. अशा पद्धतीने तुम्ही दीर्घकाळात करोडोंची रक्कम जमा करू शकता.

एकरक्कमी गुंतवणुकीतून देखील होईल चांगली कमाई :

एसबीआयच्या या भन्नाट गुंतवणुकीमुळे अनेकांनी एकरक्कम गुंतवणूक करून देखील भरघोस पैसे कमवले आहेत. लॉन्चिंगपासून ते आत्तापर्यंत 17.12% मिळवून दिले आहेत. 25 वर्षांत 1 लाखांची केलेली गुंतवणूक 55 लाख रुपयांपर्यंत पोहोचते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 22 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x