27 April 2025 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | बिनधास्त खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MAZDOCK Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार
x

२०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार : रामदास आठवले

पिंपरी-चिंचवड : गुजरात आणि राज्यस्थानमधील निकालांचा हवाला देत आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील अस भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. भाजपच्या एकूण जागांचा आकडा घसरून २५० पर्यंत येईल परंतु पुन्हा भाजपच सत्तेत येईल अस ही ते म्हणाले.

रामदास आठवले पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले असता त्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्यात नुकताच भीमा-कोरेगाव मधील घटनेतून प्रचंड जातीय तणाव निर्माण झाला होता. त्या संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्ही सत्तेत असलो तरी गृहखातं माझ्याकडे नाही. मात्र या घटनेतील दोषींवर कारवाई सरकारची भूमिका आहे. भीमा-कोरेगाव मधील घटनेत दगडफेक करणाऱ्यांना सरकारने अटक केलं आहे.

पुढे शिवसेनेच्या स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या प्रश्नांना उत्तरं देताना आठवले म्हणाले की, “शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज एक बोलतात आणि उद्या दुसरंच बोलतात. त्यामुळे आज जरी ते स्वतंत्र निवडणुका लढवू असं म्हणत असले तरी उद्या ते निर्णय बदलतील असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या