25 November 2024 2:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | सोमवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा शेअर तुफान (NSE: RVNL) तेजीत होता. सोमवार 25 नोव्हेंबर रोजी हा शेअर 6.69 टक्के वाढून 448.30 रुपयांवर पोहोचला होता. आरव्हीएनएल शेअर्स तेजीचे कारण कंपनीला मिळालेला नवीन कॉन्ट्रॅक्ट हे आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी पूर्व रेल्वेकडून कॉण्ट्रॅक्ट मिळाला आहे. हा प्रोजेक्ट आरव्हीएनएल आणि एससीपीएल कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला देण्यात आला आहे. हा कॉन्ट्रॅक्ट एकूण ८३७.६७ कोटी रुपयाच्या आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

कॉन्ट्रॅक्टबद्दल अधिक माहिती

आरव्हीएनएल कंपनी आणि एससीपीएल कंपनीला मिळालेल्या या प्रकल्पात मातीकाम, लहान-मोठे पूल बांधणे, लेव्हल क्रॉसिंग, संरक्षक भिंती आणि ड्रेनेजची कामे यांचा समावेश आहे. या संयुक्त उपक्रमात आरव्हीएनएल कंपनीचा ७४% हिस्सा आहे. तर, एससीपीएल कंपनीचा २६% हिस्सा आहे. या दोन्ही कंपन्यांना हा प्रकल्प ३६ महिन्यांत पूर्ण करावा लागणार आहे.

शेअरने 2000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला

रेल्वे विकास निगम लिमिटेड लिमिटेड कंपनीच्या शेअरने गेल्या ४ वर्षांत २००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 27 नोव्हेंबर 2020 रोजी आरव्हीएनएल कंपनीचा शेअर 21.85 रुपयांवर होता. आरव्हीएनएल कंपनीचा शेअर २५ नोव्हेंबर २०२४ रोजी ४६२.७५ रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या 3 वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये 1200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 26 नोव्हेंबर 2021 रोजी आरव्हीएनएलचा शेअर 35.10 रुपयांवर व्यवहार करत होता. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी आरव्हीएनएल कंपनीचा शेअर ४६० रुपयांच्या वर गेला. आरव्हीएनएल कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ६४७ रुपये होता. तर, आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १६२.१० रुपये होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 25 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x