25 November 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
x

SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News

SIP Vs Post Office

SIP Vs Post Office RD Investment | समजा तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैशांची बचत करायची असेल तर, गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस आरडी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे दोन पर्याय अतिशय फायदेशीर ठरू शकतात. समजा तुम्ही 10 हजार रुपयांची गुंतवणूक 5 वर्षांसाठी केली तर, तुम्हाला दोघांपैकी कोणत्या योजनेमध्ये सर्वाधिक परतावा मिळेल. आज या बातमीतून आपण या दोन्ही योजनांच्या गुंतवणुकीविषयी आणि परताव्याविषयी जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिस आरडी :

पोस्टाची आरडी योजना ही बँक एफडीप्रमाणे असते. यामध्ये तुम्हाला सर्वाधिक व्याजदराची हमी मिळते. पोस्टाची आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट 5 वर्षांसाठीची असते. सध्या पोस्टात आरडीवर 6.7% ने व्याजदर दिले जात आहे. तुम्ही पोस्टाच्या आरडीमध्ये 5 वर्षांसाठी 10 हजार रुपये गुंतवले तर ही रक्कम 6 लाख रुपये एवढी होईल. यावर तुम्हाला व्याजदराने 1,13,659 रुपयांचं व्याज मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात एकूण 7,13,659 रुपये मिळतील.

SIP मासिक गुंतवणूक :

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही योजना एक प्रकारची मार्केट लिंक योजना असते. तिच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करून मोठा लाभ मिळवू शकता. एवढेच नाही तर एसआयपीमध्ये तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता.

एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये तुम्ही 5 वर्षांसाठी 10,000 रुपयांची रक्कम गुंतवली तर, 6 लाखांची रक्कम तयार होते. एसआयपीवर 12% परतावा दिला जातो. आता व्याजदर जास्त असल्यामुळे तुमची परताव्याची रक्कम देखील वाढेल. 12% ने तुम्ही केवळ व्याजाचे 2,24,864 रुपये जमा होतात. म्हणजेच एकूण 5 वर्षानंतर तुमच्या खात्यात एकूण 8,24,864 रुपयांची रक्कम जमा होईल.

एसआयपीमध्ये सध्या 12% परतावा दिल्या जात आहे. कालांतराने व्याजदर आणखीन वाढू शकतात आणि गुंतवणूकदारांना अधिक फायदा मिळवून देऊ शकतात. ही योजना महागाईवर पुरेपूर मात करण्यास खरी उतरते असं अनेक जाणकारांचं मत आहे. त्याचबरोबर एसआयपीची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त काळ पैसे गुंतवले तर तुम्ही कंपाऊंड व्याजाचा लाभ देखील उचलू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Vs Post Office 25 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SIP Vs Post Office(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x