26 November 2024 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Salary Account | 90% पगारदारांना सॅलरी अकाउंटवर मिळणाऱ्या 'या' फ्री सुविधांविषयी माहिती नाही, अनेक फायदे मिळतात

Salary Account

Salary Account | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट हे असतेच. सॅलरी अकाउंट हे सेविंग अकाउंटपेक्षा थोड्याफार प्रमाणात वेगळे असते. सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला कंपनीकडून सॅलरी पाठवली जाते. हे खातं तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत आहात तिथूनच उघडले जाते. परंतु या सॅलरी अकाउंटवर व्यक्तीला 1 नाही 4 नाही तर तब्बल 10 फायदे अनुभवता येतात. कोणते चला पाहूया.

1. इन्शुरन्स कव्हरेज :

काही व्यक्तींना सॅलरी अकाउंटवर ॲडिशनल सर्विस प्रोव्हाइड केली जाते. ज्यामध्ये इन्शुरन्स कव्हरेजचा समावेश असतो. सॅलरी अकाउंट तुम्हाला एक्सीडेंटल डेथ कव्हर त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स कव्हर प्रदान करते. ज्यामुळे तुम्हाला ॲडिशनल सिक्युरिटी मिळण्यास मदत होते.

2. चांगल्या व्याजदरावर लोन मिळते :

सॅलरी अकाउंटचा सर्वाधिक होणारा फायदा म्हणजे लोन. ज्या व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट आहे त्याला बँकेकडून कमी व्याजदराचे लोन ऑफर केले जाते. यामध्ये तुम्ही कार लोन, होम लोन किंवा इतर कोणतही लोन घेऊ शकता.

3. ओवरड्राफ्टची सुविधा :

समजा एखाद्या व्यक्तीचं सॅलरी अकाउंट आहे आणि त्याने त्याची सॅलरी काढून घेतली आहे. अशा परिस्थितीत खातेधारकाला अचानक इमर्जन्सी पैसे हवे असतील तर, तो ओवरड्राफ्ट सुविधा अवलंबू शकतो.

4. प्रायोरिटी सर्विस :

सॅलरी अकाउंटमध्ये खातेधारकाला प्रायोरिटी सर्विस देण्यात येते. यामध्ये तुम्हाला स्पेशल कस्टमर केअर नंबर त्याचबरोबर इतरही स्पेशल ऑफर्सचा लाभ घेता येतो. या सर्व सुविधांमुळे प्रायोरिटी सर्विसचा पुरेपूर लाभ ग्राहकाला घेता येतो.

5. क्रेडिट कार्ड ऑफर :

सॅलरी अकाउंट खातेधारकाला बँकेकडून मोफत क्रेडिट कार्ड ऑफर केले जाते. ज्यामध्ये वार्षिक फीवर सूट देखील देण्यात येते. त्याचबरोबर यामध्ये रिवॉर्ड पॉईंट्स देखील उपलब्ध असतात.

6. झिरो बॅलेन्सचा मिळतो फायदा :

सॅलरी अकाउंटमध्ये ग्राहकाला झिरो बॅलन्सची सुविधा अनुभवता येते. तुमच्या खात्यात एक रुपयाही नसला तरी सुद्धा तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे पेनल्टी चार्ज वसूलण्यात येणार नाहीत. ही सुविधा सेविंग अकाउंटमध्ये पाहायला मिळत नाही.

7. फ्री एटीएम ट्रांजेक्शन :

सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला विविध प्रकारचे मोफत एटीएम ट्रांजेक्शनची सुविधा मिळते. म्हणजेच तुम्ही कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस न भरता विनाशुल्क हवं तेव्हा पैसे काढू शकता.

8. फ्री डेबिट कार्ड आणि चेकबुक :

खातेधारकाला छोट्या-मोठ्या खर्चासाठी फ्री डेबिट कार्ड आणि फ्री चेक बुकची सुविधा प्रदान केली जाते.

9. डिजिटल बँकिंगसाठी मोफत सर्विस :

अगदी सहजपणे पैशांचे ट्रांजेक्शन होऊन जलद गतीने पैसे ट्रान्सफर होण्यासाठी NEFT आणि RTGS सारख्या मोफत बँकिंग सुविधा प्रदान केल्या जातात.

10. ऑनलाइन शॉपिंग ऑफर :

सॅलरी अकाउंटमधून खातेधारकाला ऑनलाइन शॉपिंगची ऑफर देण्यात येते. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिस्काउंट त्याचबरोबर कॅशबॅकचा देखील समावेश असतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Salary Account 26 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Salary Account(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x