26 November 2024 9:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनीचा आयपीओ २९ नोव्हेंबरला गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनीचा आयपीओ ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर्स जारी करेल. या आयपीओ’साठी कंपनीने प्राइस बँड निश्चित केली आहे.

आयपीओ प्राइस बँड

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी प्रति शेअर ४२० ते ४४१ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओच्या एका लॉटमध्ये एकूण ३३ शेअर्स मिळतील. म्हणजे गुंतवणूकदारांना या आयपीओ’मध्ये किमान 14,994 रुपये गुंतवावे लागणार आहे. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्सचे वाटप 4 डिसेंबरला केले जाऊ शकते. तसेच 6 डिसेंबरला या कंपनी आयपीओ’चे शेअर बाजारात सूचिबद्ध केले जाऊ शकतात. या आयपीओ’साठी गुंतवणूकदार २५ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतील.

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओचा आकार ८४६.२५ कोटी रुपये आहे. ओएफएस अंतर्गत सुरक्षा डायग्नोस्टिक कंपनी १.९२ कोटी शेअर्स जारी करणार आहे. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड आयपीओ’पूर्वी कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ६१.०७% होता.

आयपीओ’मध्ये कोणासाठी किती वाटा?

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी जास्तीत जास्त ५०% वाटा असेल. तर, रिटेल गुंतवणूकदारांचा वाटा किमान ३५% असेल. त्याचबरोबर एनआयआयसाठी किमान १५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे.

कंपनी काय करते?

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनीची स्थापना २००५ मध्ये झाली होती. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी पॅथॉलॉजी, मेडिकल कन्सल्टन्सी आणि रेडिओलॉजी सेवा पुरवते. 30 जून 2024 पर्यंत रेडिओलॉजी लिमिटेड कंपनीचे कामकाज बंगाल, बिहार, आसाम आणि मेघालयमध्ये आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा ७.६७ कोटी रुपये होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Suraksha Diagnostic Ltd 26 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x