30 November 2024 8:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Upcoming Cars | नवीन वर्षात बाजारात एन्ट्री करणार 'या' 3 नव्या 7 सीटर कार, नेमक्या कोणत्या पहा, परफेक्ट फॅमिली कार Personal Loan | 'या' 4 टिप्स फॉलो करून मिळवा स्वस्तात स्वस्त पर्सनल लोन; कोणत्याच बँकेकडून नकार मिळणार नाही Mutual Fund SIP | आता करोडपती व्हायचं स्वप्न पूर्ण होणार; केवळ या 5 गोष्टींच्या आधारे SIP सुरू करा, मग पहा जादू EPFO Pension News | पगारदारांनो, सेवानिवृत्ती मिळण्याआधी पेन्शन काढता येते का; तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलाय, मग वाचा सविस्तर Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर रेटिंग अपग्रेड, रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty Vedanta Share Price | वेंदाता शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - SGX Nifty Tata Motors Share Price | मल्टिबॅगर टाटा मोटर्स शेअर्सबाबत महत्वपूर्ण अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - SGX Nifty
x

Metro Job | आता मेट्रोमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण; अर्ज प्रक्रिया, पगार आणि पात्रता काय असेल जाणून घ्या

Metro Job

Metro Job | सरकारी नोकरी शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत खुशखबर समोर आली आहे. तरुणांसाठी नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सरकारी क्षेत्रात ते सुद्धा खास मेट्रोमध्ये नोकरी करण्याची संधी क्वचितच व्यक्तींना मिळते. नोएडा कार्पोरेशनने अधिकृत वेबसाईटवर नोकरी बाबतची संपूर्ण माहिती विस्तारित केली आहे.

कोणत्या पदासाठी भरती जाहीर केली आहे :

नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एनएमआरसीने जनरल मॅनेजर या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अशातच लवकरात लवकर तरुण मंडळींनी अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली पाहिजे. अर्ज प्रक्रिया केव्हाच सुरू झाली असून शेवटची तारीख 19 डिसेंबर देण्यात आली आहे.

भरतीसाठी पात्रता काय असेल :

मेट्रो रेल्वेमध्ये भरती होण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या पदवी देखील उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अर्जदाराच्या वयाची पात्रता :

नोएडा मेट्रो रेल्वे भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असणे मर्यादित आहे. निवड झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होऊन त्यांची ऑफलाइन पद्धतीने मुलाखत घेण्यात येणार आहे. उमेदवारांच्या वेतनश्रेणीबद्दल, महिना 1,20,000 ते 2,80,000 एवढी वेतनश्रेणी असणार आहे.

अर्ज कुठे पाठवायचा :

अनेकांना प्रश्न पडला असेल की उमेदवाराचा अर्ज कुठे पाठवायचा तर, फायनान्स अँड एचआर, जनरल मॅनेजर प्रोजेक्ट, नोएडा मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, गंगा शॉपिंग कॉम्प्लेक्स सेक्टर 29 येथे उमेदवाराने कागदपत्रे पाठवून द्यायची आहेत.

Latest Marathi News | Metro Job 29 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Metro Job(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x