29 November 2024 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Upcoming Cars | नवीन वर्षात बाजारात एन्ट्री करणार 'या' 3 नव्या 7 सीटर कार, नेमक्या कोणत्या पहा, परफेक्ट फॅमिली कार Personal Loan | 'या' 4 टिप्स फॉलो करून मिळवा स्वस्तात स्वस्त पर्सनल लोन; कोणत्याच बँकेकडून नकार मिळणार नाही Mutual Fund SIP | आता करोडपती व्हायचं स्वप्न पूर्ण होणार; केवळ या 5 गोष्टींच्या आधारे SIP सुरू करा, मग पहा जादू EPFO Pension News | पगारदारांनो, सेवानिवृत्ती मिळण्याआधी पेन्शन काढता येते का; तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलाय, मग वाचा सविस्तर Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर रेटिंग अपग्रेड, रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty Vedanta Share Price | वेंदाता शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - SGX Nifty Tata Motors Share Price | मल्टिबॅगर टाटा मोटर्स शेअर्सबाबत महत्वपूर्ण अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - SGX Nifty
x

Mutual Fund SIP | आता करोडपती व्हायचं स्वप्न पूर्ण होणार; केवळ या 5 गोष्टींच्या आधारे SIP सुरू करा, मग पहा जादू

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | सध्या बहुतांश व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत. म्युच्युअल फंड शेअर मार्केटशी जोडलेले असतात. तरीसुद्धा बऱ्याच व्यक्तींना म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याची सवय लागलेली आहे. पूर्वी बँकमध्ये पैसे जमा करणे सुरक्षिततेचे आणि गुंतवणुकीचे साधन असायचे. आता सुद्धा असले तरीही लोक बँकांमध्ये जमा असलेली रक्कम काढून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवू पाहत आहेत.

म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याची कोणतीही लिमिट किंवा अटी आणि नियम नसतात. त्यामुळे कोणताही व्यक्ती बेफिकीरपणे SIP म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. त्याचबरोबर 12% किंवा 15% व्याजदर मिळत असल्यामुळे बऱ्याच व्यक्तींना शेअर मार्केटशी निगडित असलेल्या एसआयपी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे वाटते. तुम्ही सुद्धा SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू पाहत असाल तर काही गोष्टींची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

शक्य तेवढी लवकर गुंतवणूक सुरू करा :

तुम्हाला एसआयपीमार्फत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून करोडपती बनायचं असेल तर, गुंतवणुकीची सुरुवात लवकरात लवकर करावी. तुम्ही जितका वेळ घ्याल तितकी तुमची रक्कम कमी कमी होत जाईल. परंतु दीर्घकाळामध्ये भरमसाठ पैसा तयार होऊ शकतो त्यामुळे लवकर गुंतवणूक सुरू करा.

गुंतवणुकीचे सातत्य ठेवा :

केवळ लवकरात लवकर गुंतवणूक करून चालत नाही. यासाठी तुम्हाला गुंतवणुकीचे सातत्य ठेवावे लागते. तरच, तुमच्या खात्यामध्ये भडगंज रक्कम जमा होण्यास मदत होते. त्याचबरोबर जास्तीत जास्त काळ गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला चक्रवाढ व्याज तसेच कंपाऊंडिंगचा घवघवीत लाभ अनुभवता येतो.

जोखीम आणि तुमचे गुंतवणुकीचे ध्येय महत्त्वाचे :

कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिकच सल्लागाराला भेटा. तुमच्या बजेटविषयी आणि बचत करण्याच्या ध्येयाविषयी चर्चा करा. बऱ्याचवेळा लार्ज कॅप फंड स्मॉल कॅप आणि मिडकॅप फंडाच्या तुलनेत सुरक्षित आणि फायदेचे मानले जाते.

स्टेप अपचा फायदा घ्या :

म्युच्युअल फंडमध्ये स्टेप अप देखील अत्यंत महत्त्वाचे असते. स्टेप ऑफ म्हणजे तुमच्या आर्थिक वेतन वाढीनुसार एसआयपीमध्ये देखील गुंतवणूक वाढवणे होय. या प्रक्रियेला स्टेप अप असं म्हटलं जातं.

आरामात एसआयपी करू नका :

एकदा एसआयपी सुरू केली की, अजिबात थांबायचं नाही. समजा एखाद्या व्यक्ती थांबून थांबून म्हणजेच काही काळानंतर पैसे गुंजवण्यास सुरू करत असेल तर, त्याच्याजवळ मोठा निधी कधीच तयार होणार नाही. तुम्ही 500 रुपयांची का होईना एसआयपी करा परंतु तुमच्या गुंतवणुकीत सातत्य असलं पाहिजे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 29 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(250)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x