29 November 2024 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Upcoming Cars | नवीन वर्षात बाजारात एन्ट्री करणार 'या' 3 नव्या 7 सीटर कार, नेमक्या कोणत्या पहा, परफेक्ट फॅमिली कार Personal Loan | 'या' 4 टिप्स फॉलो करून मिळवा स्वस्तात स्वस्त पर्सनल लोन; कोणत्याच बँकेकडून नकार मिळणार नाही Mutual Fund SIP | आता करोडपती व्हायचं स्वप्न पूर्ण होणार; केवळ या 5 गोष्टींच्या आधारे SIP सुरू करा, मग पहा जादू EPFO Pension News | पगारदारांनो, सेवानिवृत्ती मिळण्याआधी पेन्शन काढता येते का; तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलाय, मग वाचा सविस्तर Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर रेटिंग अपग्रेड, रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty Vedanta Share Price | वेंदाता शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - SGX Nifty Tata Motors Share Price | मल्टिबॅगर टाटा मोटर्स शेअर्सबाबत महत्वपूर्ण अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - SGX Nifty
x

Upcoming Cars | नवीन वर्षात बाजारात एन्ट्री करणार 'या' 3 नव्या 7 सीटर कार, नेमक्या कोणत्या पहा, परफेक्ट फॅमिली कार

Upcoming Cars

Upcoming Cars | बऱ्याच वर्षांपासून भारतामध्ये 7 सीट असलेल्या कारची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अनेकांना 7 सीट असलेली गाडी आणि तिचे फीचर्स चांगलेच भावले आहेत. अशातच सध्या मार्केटमध्ये टोयोटा इनोवा, मारुती सुझुकी अर्टिगा, इनोवा क्रिस्टा यांसारख्या गाड्या सध्या लोकप्रिय असलेल्या पाहायला मिळतात. 7 सीटर कार प्रेमींना पुढच्या वर्षी सुखद बातमी मिळणार आहे. कारण की मारुती सुझुकी सारख्या मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या 7 स्टार मॉडेल कारला लॉन्च करणार आहेत. नेमक्या कोणत्या आहेत या कार पाहून घ्या.

1. किआ कॅरेन्स फेसलिफ्ट :

भारतातील सर्वात लोकप्रिय एमपीव्हीपैकी किआ कॅरेन्स ही देखील एक आहे. बाजारात किआ कॅरेन्सचे लाखो चाहते पाहायला मिळतात. दरम्यान कंपनी किआ कॅरेन्सचे आणखीन नवीन मॉडेल्स नवीन वर्षात शक्य तितके लवकर लॉन्च करणार आहे. ज्यामध्ये 7 सीटर कारचा समावेश असणार आहे. किआ कॅरेन्सची किंमत 10.52 लाख रुपयांपासून सुरू होते परंतु शोरूममध्ये 19.94 लाखाला विकली जाते. एवढ्या कमी किंमतीत 7 सीटर कार मिळणे अत्यंत फायद्याचे आहे.

2. 7 सीटर मारुती ग्रँड विटारा :

मारुती सुझुकी ग्रँड विटारा हे मॉडल भारतातील सर्वांत लोकप्रिय मॉडेल पैकी एक आहे. लवकरच या मॉडलचे 7 सीटर मारुती ग्रँड विटारा मॉडल ग्राहकांसमोर प्रदर्शित करण्यात येणार आहे. याचे लॉन्चिंग 2025 मध्ये करण्यात येणार असून. पहिल्या सहामाहीतच कार लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना कारमध्ये सर्वात मोठा बदल पाहायला मिळेल. कारचं इंटिरियर आणि एक्सटिरियर अत्यंत कमालीचं असणार आहे. त्याचबरोबर या कारची किंमत 20.9 लाख रुपये आहे.

3. एमजी ग्लॉस्टर फेसलिफ्ट :

एमजी ग्लॉस्टर ही देखील भारतातील लोकप्रिय एमपीवीपैकी एक आहे. लवकरात लवकर कंपनी आपले अपडेटेड वर्जन बाजारात घेऊन येणार आहे. नवीन येणाऱ्या एमजी ग्लॉस्टरमध्ये ग्राहकांना भला मोठा बदल पाहायला मिळेल. ही कार इतर कारपेक्षा अत्यंत आकर्षक आणि कमल मॉडेल असणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Upcoming Cars 29 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Upcoming Cars(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x