12 December 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

SIP Investment | SIP मधून सर्वाधिक परतावा कमवायचा असेल तर 'या' तारखा लक्षात ठेवा; फायदाच फायदा होईल - Marathi News

SIP Investment

SIP Investment | एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. आतापर्यंत इतर योजनांपेक्षा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण अधिकांश वाढले आहे. तुम्ही कोणत्या फंडात गुंतवणूक करत आहात त्याचबरोबर गुंतवणुकीचे ध्येय काय, तुम्ही तुमच्या बजेटनुसार तर गुंतवणूक करत आहात ना या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असणे महत्त्वाचे आहे. एवढेच नाही तर तुम्ही तुमची गुंतवणूक नेमक्या कोणत्या तारखेला सुरू करत आहात ही गोष्ट देखील फायद्याच्या बाबतीत परिणामकारक ठरू शकते.

तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 1 , 15 आणि 30 तारीख तुमच्यासाठी लकी ठरू शकते. या तिन्ही तारखांच्या गुंतवणुकीचे महत्त्व वेगवेगळे असू शकते. या तारखांना तुम्ही तेव्हाच गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल जेव्हा तुम्हाला मोठा कॉर्पस दीर्घकाळापर्यंत तयार करायचा असेल. त्याचबरोबर बाजारातील चढउतारांचा आढावा लक्षात घेता तुम्हाला गुंतवणुकी करिता एक महत्त्वाचा दिवस निवडून काढावा लागेल.

जाणून घ्या कोणती तारीख तुम्हाला लकी ठरू शकते :

1. बऱ्याच बाजारतज्ञांचे असे म्हणणे आहे की, शेअर बाजाराशी निगडित असणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिन्याचा पहिला दिवस अत्यंत लकी आणि फायद्याचा ठरू शकतो. तुम्ही अगदी बेफिकीरपणे कोणत्याही महिन्याच्या 1 तारखेपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जेणेकरून तुम्हाला नियोजनाचा आणि होणाऱ्या परिणामांचा व्यवस्थित आढावा घेता येईल.

2. तज्ञांच्या मतानुसार महिन्याच्या मध्य तारखेला म्हणजेच 15 तारखेला पैशांची गुंतवणूक करणे मोठे फायद्याचे ठरू शकते. महिन्याच्या मध्यतारखेला होऊन पैसे गुंतवले असता तुम्हाला बाजारातील चढउतारांचा देखील योग्य आढावा घेता येईल.

3. बऱ्याच व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेतात. यामधून असं देखील समजून आलं आहे की, ज्या वेळेला बाजाराचा कल नकारात्मकतेकडून सकारात्मक वाटचालीकडे जातो तेव्हा गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. ज्यामध्ये महिन्याची शेवटची तारीख म्हणजेच 30 तारीख तुमच्यासाठी लकी ठरू शकते.

SIP गुंतवणुकीपूर्वी योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे :

तुम्ही एसआयपी गुंतवणूक करत असाल तर गुंतवणुकीच्या नियोजनाबद्दल पुरेपूर माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की एसआयपीच्या गुंतवणुकीचा ट्रेंड लक्षात घेता तुम्हाला गुंतवणूक सुरू करायची आहे. या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचा आर्थिक दृष्टिकोन देखील व्यवस्थितपणे पडताळूनच गुंतवणूक क्षेत्रात उतरले पाहिजे. तसं पाहायला गेलं तर, तुम्हाला दीर्घ काळासाठी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करायची असेल तर कोणत्याही प्रकारची तारीख महत्त्वाची नाही परंतु सातत्य मात्र महत्वाचे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Investment 30 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SIP investment(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x