7 January 2025 8:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

Business Idea | गृहिणींसाठी घरच्या घरी बक्कळ कमाई करून देणारे 4 लघु व्यवसाय; कमीत कमी भांडवलातून सुरुवात करा

Business Idea

Business Idea | प्रत्येक महिलेला संपूर्ण कुटुंब सांभाळून आपली नोकरी किंवा व्यवसाय करावा लागतो. कालांतराने मूलबाळ झाल्यानंतर तेही थोड्याफार प्रमाणात बंद होतं. परंतु घरामधील कुटुंबाचे नियोजन त्याचबरोबर हुशारी असल्यामुळे कोणतीही महिला छोट्या प्रमाणातले बिजनेस अगदी उत्तमरित्या सांभाळू शकते. वेळ मिळून सुद्धा कुटुंबातील जबाबदाऱ्या मागे खेचतात. अशावेळी तुम्ही जास्त मोठ्याही नाही आणि अगदी लहानही नाही तुम्ही मार्केटमध्ये प्रचंड मागणी असलेले व्यवसाय करून देखील भरपूर पैसे कमवू शकता.

द्रोण पत्रावळी :

तुमच्यापैकी कोणतीही महिला द्रोण किंवा पत्रावळीचा बिजनेस सुरू करू शकते. यामध्ये तुम्ही फार कमी खर्चात स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता. पूर्वी पळसाच्या पानापासून द्रोण बनवले जायचे. वापर करून झाल्यानंतर हे द्रोण फेकून नष्ट देखील करता येतात. त्याचबरोबर आधुनिकीकरणामुळे सध्या कागदांच्या पत्रावळ्याचा वापर केला जातो. तुम्ही हा छोटा बिझनेस सुरू करून लाखो रुपयांची कमाई करू शकता.

कापडी पिशव्या :

तुम्ही घरच्या घरी छोट्या प्रमाणात कापडी पिशवी शिवण्याचा व्यवसाय करू शकता. यासाठी तुम्हाला एक ते दीड लाखापर्यंत भांडवलाची गरज लागेल. कापडी पिशव्यांची बाजारात प्रचंड मागणी आहे. प्लास्टिक बंदी केल्यानंतर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या विकल्या जात आहेत. हा व्यवसाय मोठा झाल्यानंतर तुमचा खर्च देखील वाढू शकतो परंतु तेवढी आवक देखील राहील.

मसाला घरगुती उद्योग :

पूर्वीच्या काळी सर्वच महिला कच्चा मसाला आणून घरच्या घरी मसाला पूड तयार करायच्या. काही महिला दर वर्षभरासाठीचा मसाला एकदाच म्हणून ठेवायच्या. पण तू सध्याच्या या धकाधकीच्या बहुतांश महिलांना मसाला बनवण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे घरगुती पद्धतीने तयार केलेला मसाला बाजारात मोठ्या प्रमाणात विकला जातो. तुम्ही जर हा व्यवसाय सुरू केला तर तुमचा व्यवसाय तुफान चालेल. दररोजच्या भाजीला आणि डाळीला लागणारा घरगुती पद्धतीचा मसाला तयार करण्यासाठी तुम्हाला बाजारातून कच्चा मसाला घेऊन यावं लागेल आणि घरच्या घरी मसाला अजून कुठून द्यावा लागेल.

पापड उद्योग :

एखाद्या महिलेला घरच्या घरी लघु उद्योगाला सुरुवात करायची असेल तर, पापड बनवण्याचा उद्योग अतिशय बेस्ट ठरू शकतो. यासाठी तुम्हाला पापडखार आणि पोलपाट लाटणं, त्याचबरोबर इतर भांडवलासाठी वस्तू खरेदी करावे लागतील. तुमच्या पापडांची चव ग्राहकांना आवडल्यानंतर तुमचा बिजनेस मोठ्या प्रमाणात चालू शकेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Business Idea 30 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Business Idea(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x