4 December 2024 11:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | निफ्टीने नुकतेच येस बँकेला पुन्हा एफ अँड ओ सेगमेंटमध्ये आणले असून ही बँक आता हळूहळू नफ्यातही (SGX Nifty) येत आहे. अशा तऱ्हेने येस बँके पुन्हा गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये आला आहे. तज्ज्ञांनी सुद्धा येस बँके बाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (येस बँक अंश)

येस बँकबाबत तज्ज्ञांचा सल्ला

स्टॉक मार्केट तज्ज्ञ प्रकाश गाबा यांच्या मते येस बँके लिमिटेडचा शेअर सध्या सपोर्ट बनवत आहे. मात्र अनेकदा बेस तयार होण्यासाठी अधिक कालावधी लागतो, पण त्यानंतर असे शेअर्स खूप वेगाने तेजीत येतात. येस बँके शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ प्रकाश गाबा यांनी सल्ला देताना म्हटले की, ‘स्टॉक मार्केट निफ्टीवर येस बँक शेअरचे पुन्हा एफ अँड ओ सेगमेंटमध्ये आगमन झाले असून ही बँक आता नफ्यातही येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून या शेअरबाबत सकारात्मक विचार केला पाहिजे.

प्रकाश गाबा पुढे म्हणाले की, ‘येस बँक शेअरच्या चार्टमध्ये सध्या कंसॉलिडेशन सुरू असल्याचे संकेत दिसत आहे. कधी कधी शेअरला बेस तयार करायला मोठा कालावधी लागतो. येस बँके शेअर वरच्या दिशेने ३० रुपयांचा जोरदार रेझिस्टन्स आहे. जर गुंतवणूकदारांचे लॉन्ग टर्म गुंतवणुकीचे ध्येय असल्यास ते हा शेअर ‘Hold’ करू शकतात, असं देखील प्रकाश गाबा म्हणाले.

येस बँक शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी येस बँक शेअर 3.73 टक्के वाढून 20.84 रुपयांवर पोहोचला होता. येस बँक शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 32.85 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 19.02 रुपये होता. येस बँकेचे एकूण मार्केट कॅप 65,268 कोटी रुपये आहे.

येस बँक शेअरने 68.47% परतावा दिला

मागील ५ दिवसात या शेअरने 4.10% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात येस बँक शेअरने 2.51% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 11.51% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 6.60% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात येस बँक शेअर 62.79% घसरला आहे. YTD आधारावर हा शेअर 7.99% घसरला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना येस बँक शेअरने 68.47% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price 03 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x