11 December 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Post Office FD | पोस्टाच्या एफडीत 2 लाखांची रक्कम गुंतवा आणि व्याजाने प्रत्येक महिन्याला पैसे कमवा, फायद्याची बातमी

Post Office FD

Post Office FD | इंडियन पोस्टाच्या सर्वच योजना सरकारी असल्यामुळे सुरक्षित देखील असतात. ज्या व्यक्तींना गुंतवणूक क्षेत्रात कोणत्याही प्रकारची जोखीम उचलायची नसेल त्या व्यक्तींसाठी पोस्टाची योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यासाठी पोस्टाची एफडी म्हणजे तो फिक्स्ड डिपॉझिट उत्तम ठरेल. योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये 2 लाखांची रक्कम गुंतवून प्रत्येक महिन्याला व्याजाने पैसे कमवू शकता.

पोस्ट ऑफिस एफडी योजनेचे वैशिष्ट्य काय :

1. पोस्टाची एफडी योजना ही एक प्रकारची सरकारी योजना आहे. अनेकजण या योजनेमध्ये सिक्युरिटीसाठी पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात.

2. या योजनेमध्ये तुम्ही केवळ 5 वर्ष नाही तर, 1,2 आणि 3 वर्षांसाठी देखील पैशांची गुंतवणूक करू शकता. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला आपल्या बजेटनुसार पैसे गुंतवून व्याजाने पैसे कमावता येतील.

3. पोस्टाची एफडी योजना 5.5% ते 7% टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याजदर देते. 5 वर्षांच्या एफडीवर तुम्हाला कर सवलतीचा लाभ देखील अनुभवायला मिळतो.

4. शून्य जोखीम आणि अधिक सुरक्षित असलेली ही योजना आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी कागदपत्रांसह योजनेमध्ये खातं उघडता येऊ शकतं.

5. या योजनेचा खाते उघडण्यासाठी तुमच्याजवळ आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, नॉमिनी ओळखपत्र, सॅलरी स्लिप, पासपोर्ट साईजचे फोटो, लाईट बिल, रेशन कार्ड किंवा पासपोर्ट यांपैकी बरेच कागदपत्र कामी येऊ शकतात.

6. पोस्टाच्या एफडीमध्ये खाते उघडण्यासाठी केवळ 1000 रुपयांची रक्कम गुंतवून सुरुवात करू शकता. त्याचबरोबर जमा केलेल्या रक्कमेवर तुम्ही एफडी सर्टिफिकेट देखील प्राप्त करून घ्या. त्याचबरोबर फॉर्मवर असलेली संपूर्ण माहिती भरून गरजेचे कागदपत्र जोडा.

1 ते 5 वर्षांचं कॅल्क्युलेशन पाहून घ्या :

1. समजा गुंतवणूकदाराने 1 वर्षाची एफडी केली तर, 6.9% व्याजदराने 2,13,800 रुपये मॅच्युरिटी नंतर मिळतील.
2. दोन वर्षांच्या 7.0% व्याजदरानुसार 2 लाखांवर 2,29,400 रुपये मिळतील.
3. समजा तुम्ही 3 वर्षांसाठी 2 लाखांची एफडी करत असाल तर, 7.0% व्याजदरानुसार 2,45,900 रुपये मिळतील.
4. समजा तुम्ही 5 वर्षांसाठी 2 लाखांची एफडी करत असाल तर, 7.5% व्याजदराने 2,86,100 रुपये परत मिळतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office FD Thursday 05 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office FD(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x