11 December 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी संमिश्र जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये किंचित वाढ (Gift Nifty Live) झाली आहे. शुक्रवारच्या व्यवहारात स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक कालच्या बंदच्या (SGX Nifty) जवळ आहेत. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी किरकोळ घसरणीसह २४७०० पर्यंत खाली आला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये 25 अंकांची किरकोळ वाढ पाहायला मिळाली होती. (टाटा स्टील कंपनी अंश)

दरम्यान, ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञ बिनोद यांनी टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला दिला आहे आणि गुंतवणुकीची रणनीतीही देखील सांगितली आहे.

टाटा स्टील शेअर – तज्ज्ञांचा सल्ला काय

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर संवाद साधताना स्टॉक मार्केट तज्ज्ञ बिनोद यांनी टाटा स्टील शेअरबाबत सल्ला देताना सांगितले की, ‘एकंदरीत स्ट्रक्चरल आउटलूक चांगला नसल्यामुळे टाटा स्टील शेअर धातू क्षेत्रात ‘अंडरपरफॉर्म’ कामगिरी करू शकतो. स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, मागणी आणि पुरवठ्यात चिंता करण्यासाठी स्थिती आहे. याशिवाय टाटा स्टील लिमिटेड कंपनीवरील कर्जाबाबतही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

त्यामुळे गुंतवणूकदारांनी टाटा स्टील शेअर्स अधिक काळ ‘Hold’ न करता तोटा-बुक करून इतर चांगल्या आणि दर्जेदार शेअरमध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

टाटा स्टील शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी टाटा स्टील शेअर 0.048 टक्के घसरून 147 रुपयांवर पोहोचला होता. टाटा स्टील लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 184.60 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 127.85 रुपये होता. टाटा स्टील लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप 1,83,695 कोटी रुपये आहे.

टाटा स्टील शेअरने 2015 टक्के परतावा दिला

शुक्रवार 06 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरने 1.85% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 4.31% घसरला आहे. मागील ६ महिन्यात टाटा स्टील शेअरने 14.56% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात टाटा स्टील शेअरने 11.49% परतावा दिला आहे. YTD आधारावर टाटा स्टील शेअरने 5.11% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा स्टील शेअरने 264.49% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 2,015.11% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price Friday 06 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x