14 December 2024 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर

Monthly Pension Scheme

Monthly Pension Scheme | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कुटुंबीयांसाठी किंवा निवृत्तीकाळापर्यंत स्वतःची जमापुंजी साठवून ठेवतो. बचतीसाठी प्रत्येक व्यक्ती चांगला मोबदला देणारी योजना शोधतात. यासाठीच सरकारची अटल पेन्शन योजना आहे.

अटल पेन्शन योजना कोणासाठी :

1. भारतातला कोणताही नागरिक अटल पेन्शन योजनेसाठी पात्र आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणताही व्यक्ती अटल पेन्शन योजनेत सहभागी होऊ शकतो.

2. सध्या अटल पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूकदारांचा आकडा 7 कोटींच्या घरात पोहोचला आहे. कारण की या योजनेत पैसे गुंतवल्यामुळे सरकार गुंतवणूकदारांना परताव्याची 100% हमी देत आहे.

3. योजना इतकी पावरफुल आहे की, अवघ्या एका वर्षात 56 लाखग्राहक योजनेशी जोडले आहेत. यामध्ये नागरिकांच्या छोट्याशा गुंतवणुकीवरून त्यांना महिन्याला 1000, 2000 किंवा 5000 रुपयांपर्यंत पैशाने मिळू शकते.

4. अटल पेन्शन योजनेच्या नियमांबद्दल सांगायचे झाले तर, नागरिकाने या योजनेत किमान 20 वर्षे गुंतवणूक करायला हवी. समजा गुंतवणूकदाराचे वय 18 वर्ष आहे तर, त्याला प्रत्येक महिन्याला 210 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच काय तर प्रति दिवस 7 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

5. गुंतवणुकीचा हा फंडा अवलंबल्यामुळे नागरिकाला 60 व्या वर्षानंतर 5000 रुपयांची पेन्शन प्राप्त होऊ शकते.

6. एखाद्या नागरिकाला 5000 नाही तर केवळ 1000 रुपये प्रति महिना पेन्शन हवी असेल तर, त्याला प्रत्येक महिन्याला 42 रुपयांचे योगदान द्यावे लागेल. समजा त्या व्यक्तीने 40 व्या वर्षापासून अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरू केली असेल तर 60 व्या वर्षापासून पेन्शन सुरू होईल.

7. अटल पेन्शन योजनेमध्ये नॉमिनीची देखील सुविधा आहे. समजा तुम्ही मृत्युमुखी पावला तर, या योजनेचा फायदा तुमच्या पत्नीला आणि तुमच्या कुटुंबीयांना होऊ शकतो.

8. अटल पेन्शन योजनेत पैशांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कर सवलतीचा लाभ देखील अनुभवायला मिळतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकाचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे महत्त्वाचे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Monthly Pension Scheme Saturday 14 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Monthly Pension Scheme(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x