13 January 2025 10:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

SIP Calculator | 10 हजाराची SIP तुम्हाला किती वर्षांत करोडपती बनवू शकते; जाणून घ्या गुंतवणुकीचे योग्य कॅल्क्युलेशन

SIP Calculator

SIP Calculator | प्रत्येक व्यक्तीला रिटायरमेंट होण्याआधीच आपल्या पुढील जीवनासाठी आयुष्यभराची जमापुंजी साठवून ठेवायची असते. त्यासाठी बऱ्याच व्यक्ती नोकरीला असताना पैसे जमा करून ठेवतात. जेणेकरून उतार वयात कोणत्याही प्रकारचे काम करून पोट भरावे लागणार नाही. पैसे गुंतवणुकीसाठी व्यक्ती अधिक व्याजदर देणारी आणि जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी योजना शोधतात.

दरम्यान बऱ्याच व्यक्ती एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅननुसार देखील गुंतवणूक करू पाहतात. बरेच गुंतवणूकदार SIP माध्यमातून विविध म्युच्युअल फंडात देखील पैसे गुंतवतात. लोक पैसे तर गुंतवतात परंतु त्यांना गुंतवणुकीचा योग्य नियम ठाऊक नसतो. आज आम्ही तुम्हाला या बातमीपत्रातून एसआयपी गुंतवणुकीचा एक जबरदस्त फॉर्म्युला सांगणार आहोत.

10 हजारांची एसआयपी बनवेल करोडपती :

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये तुम्हाला 12 ते 15 टक्क्यांपर्यंत व्याजदर उपलब्ध केले जाते. व्याजदराच्या वाढत्या टक्केवारीमुळे तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून कंपाऊंडिंगमुळे आणखीन श्रीमंत होऊ शकता.

10-15-18 या फॉर्मुल्याच्या मदतीने करा गुंतवणूक :

समजा तुम्ही 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून करोडपती होण्याचं स्वप्न पाहत आहात तर, 10-15-18 हा फॉर्म्युला तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो. या फॉर्म्युल्यामुळे तुम्ही SIP मार्फत पैसे गुंतवून करोडो रुपयांचा निधी जमा करू शकता. फॉर्म्युलानुसार 10 म्हणजे गुंतवणुकीची 10 हजारांची रक्कम, 15 म्हणजे 15% मिळणारा परतावा आणि 18 म्हणजे 18 वर्ष लगातार गुंतवणूक करणे.

किती वर्षांत करोडपती व्हाल :

तुम्ही 10-15-18 या फॉर्म्युलानुसार 10 हजाराची मासिक SIP सुरू केली तर, तुम्ही 18 वर्षांत 1,10,42,553 रुपये जमा कराल. यामध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक 21,60,000 असेल आणि व्याजाने मिळालेले पैसे 88,82,553 रुपये असतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Calculator Monday 09 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x