11 December 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या

5 Star Rating Cars

5 Star Rating Cars | आपल्या घरासमोर स्वतःची गाडी उभी असावी असं स्वप्न प्रत्येक तरुणाचं असतं. दरम्यान कार खरेदी करणं म्हणजे कारची सेफ्टी देखील पाहणं महत्त्वाचं आहे. अनेकांना 100% सुरक्षित कार खरेदी करण्यासाठी जास्त पैशांची गरज लागते असं वाटतं परंतु तुम्हाला दहा लाखांच्या आतमध्ये 5 स्टार रेटिंग कार खरेदी करता येणार आहेत.

महिंद्रा XUV 3XO :

भारताच्या NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये महिंद्रा XUV 3XO या कारने बाजी मारली आहे. सर्वाधिक उत्तम आणि सेफ्टी कार असलेल्या गाड्यांच्या लिस्टमध्ये महिंद्रा XUV 3XO ने महत्त्वाचा क्रमांक पटकावला आहे. या कारची डिझाईन अत्यंत लक्झुरिअस वाटते. दरम्यान कारच्या इंजिनबद्दल सांगायचे झाले तर, तुम्हाला यामध्ये 1.2L टर्बो पोर्टल इंजिनची 96kW आणि 200 Nm टॉर्क जनरेट मिळते. या कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील उपलब्ध आहेत. कारच्या मायलेजबद्दल सांगायचे झाले तर 21.2 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज येते. या कारची किंमत 7.79 लाख रुपयांपर्यंत आहे.

टाटा कर्व्ह :

टाटा कर्व्ह कारची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपये दिली गेली आहे. या कारला देखील 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. कारच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, तुम्हाला यामध्ये साईड चेस्टबॅग, साईड हेड एअरबॅग, फ्रंट एअरबॅग त्याचबरोबर सीट बेल्ट रिमाइंडरसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी डिझायर :

मारुती सुझुकीने नुकतीच डिझायर कार लॉन्च केली आहे. ही कार देखील 5 स्टार रेटिंगमध्ये शामिल असून या कारची किंमत 6.79 लाख रुपये आहे. या कारची किंमत 10.14 लाखापर्यंत देखील जाऊ शकते. कारच्या जबरदस्त इंजिनबद्दल सांगायचे झाले तर, 5 ऑटोमॅटिक आणि 5 मॅन्युअल ट्रान्समिशन जोडलेले आहे. दरम्यान या कारमध्ये 1.2 पॉवर लिटरचे इंजिन उपलब्ध आहे. कारच्या फीचर्समध्ये तुम्हाला 6 एअरबॅग्स, EBD, 3 पॉईंट सीट बेल्ट, अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम उपलब्ध आहे.

Latest Marathi News | 5 Star Rating Cars Monday 09 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#5 Star Rating Cars(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x