6 January 2025 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA
x

Aadhar Card | मृत व्यक्तीच्या आधार कार्डमुळे होऊ शकतात सायबर फ्रॉड; कशी लावाल विल्हेवाट, इथे पहा योग्य पद्धत

Aadhar Card

Aadhar Card | आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आपले आधार कार्ड. सध्याच्या घडीला प्रत्येक भारतीय नागरिकाकडे स्वतःचे आधार कार्ड उपलब्ध आहे. शाळेतील मुलांचे, कॉलेजमधील तरुणांचे त्याचबरोबर ऑफिसमधील नोकरदारांकडे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या कामांसाठी आधार कार्डची गरज भासते.

समजा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर आपण कधीतरी त्याचे आधार कार्ड हाती लागल्यावर सहजपणे फेकून देतो परंतु असं केल्याने मृत व्यक्तीच्या आधार कार्डचा वापर करून कोणताही व्यक्ती फ्रॉड केसेस करू शकतो. ज्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आधार कार्ड UIDAI मार्फत तयार केले जाते. यामध्ये ग्राहकाच्या नावासकट पत्ता आणि इतर डिटेल्सचा देखील समावेश असतो. अनेक व्यक्तींना असा प्रश्न पडतो की, UIDAI मार्फत आधार कार्ड बंद केले जाऊ शकते का. आज आपण या सर्व गोष्टी समजून घेणार आहोत.

मृत व्यक्तीच्या आधार कार्डमुळे होऊ शकते अनेकांचे नुकसान :

सायबर फ्रॉडच्या केसेस प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये हॅकर मृत व्यक्तींच्या आधार कार्डचा चुकीचा वापर करून अनेकांची फसवणूक देखील करू शकतात. अशा परिस्थितीत तूम्ही तुमच्या घरातील मृत व्यक्तीच्या आधार कार्डची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही आधार कार्डचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकता.

आधार कार्डचे बायोमेट्रिक्स अशा पद्धतीने लॉक करा :

1. आधार कार्ड वरील मृत व्यक्तीचे बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी तुम्हाला सर्वातआधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
2. त्यानंतर आधार सर्विस या ऑप्शनवर क्लिक करून लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्सवर देखील क्लिक करायचं आहे.
3. तुम्हाला ज्या व्यक्तीचा आधार कार्ड बायोमेट्रिक्स लॉक करायचा आहे त्याचा आधार क्रमांक टाकून कॅप्चा कोड देखील टाकून घ्या.
4. आता आधार कार्डला रजिस्टर असलेल्या नंबरवर आलेला OTP टाकून घ्या. ही संपूर्ण प्रोसेस करून झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड बायोमेट्रिक्स लॉक आणि अनलॉक करण्याचे ऑप्शन मिळतील.

महत्वाचं :

महत्वाची गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीचा आधार कार्ड तुम्ही कॅन्सल करू शकत नाही. तुम्ही केवळ त्याचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Aadhar Card Tuesday 10 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Aadhar Card(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x