11 December 2024 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओ’मार्फत इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट कंपनी 4,225 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट आयपीओ’साठी 397 ते 417 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.

आयपीओ शेअर प्राईस बँड

इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. तसेच या आयपीओ’साठी अँकर गुंतवणूकदार 12 डिसेंबर 2024 रोजी गुंतवणूक करू शकतील. इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरचे अलॉटमेंट 18 डिसेंबर 2024 रोजी करण्यात येईल.

आयपीओ’मध्ये 1,475 कोटी रुपयांचा नवीन शेअर्स

इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ’मध्ये 1,475 कोटी रुपयांचे नवीन 3.54 कोटी शेअर्स आणि 2,750 कोटी रुपयांचे 6.59 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल असतील. आयपीओ मार्फत उभारण्यात येणारा निधी इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेड कंपनी IGI बेल्जियम ग्रुप आणि IGI नेदरलँड्स ग्रुपच्या संपादनासाठी तसेच सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरणार आहे.

कंपनीबद्दल माहिती

इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेड कंपनी नैसर्गिक हिरे, प्रयोगशाळेत बनवलेले हिरे, सेट ज्वेलरी, तसेच रंगीत स्टोन यांचे प्रमाणीकरण आणि मान्यता यासंबंधी सेवा क्षेत्रात काम करते. या कंपनीचा ग्लोबल मार्केटमधील एकूण वाटा अंदाजे 33 टक्के आहे.

रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी 14,595 रुपये गुंतवावे लागणार

इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया आयपीओ’मधील 75% भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 15% हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 10 % हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या आयपीओ’साठी गुंतवणूकदार किमान 35 शेअर्सपासून आणि नंतर 35 च्या पटीत बोली लावू शकतील. या आयपीओ’मध्ये रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी 14,595 रुपये गुंतवावे लागणार आहेत. या कंपनीचे शेअर्स 20 डिसेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याचा अंदाज आहे.

ग्रे-मार्केट प्रीमियम

इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया आयपीओ शेअरला अनलिस्टेड ग्रे-मार्केटमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळतोय. इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया कंपनीचा आयपीओ 10 डिसेंबर 2024 रोजी 135 रुपयांच्या प्रीमियमवर म्हणजे 35% ट्रेड करीत आहे. म्हणजेच या आयपीओ गुंतवणुकदारांना शेअर सूचिबद्ध होण्याचा दिवशी 135 रुपयांचा नफा होण्याचा अंदाज आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of International Gemmological Institute Ltd Tuesday 10 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(151)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x